Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीआता भारतात 'स्टील हब' म्हणून होणार गडचिरोलीची ओळख.. - आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते...

आता भारतात ‘स्टील हब’ म्हणून होणार गडचिरोलीची ओळख.. – आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आदिवासी,बहुल,नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता ‘स्टील हब’ म्हणून होणार आहे.भारतातील सर्वात मोठा प्लांट गडचिरोली जिल्ह्यात विकसित केला जाणार असून त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.अश्यातच आज,मंगळवार २२ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड च्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात येत आहे.यात हेडरी येथील ५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांट,हेडरी ते कोनसरी ८५ किलोमीटर लांबीची आणि १० मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेची स्लरी पाइपलाइन व कोनसरी येथील ४ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा पेलेट प्रकल्प यांचे उद्घाटन तसेच कोनसरी येथे ४.५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या एकात्मिक स्टील प्रकल्प,कोनसरी येथील १०० खाटांचे रुग्णालय,कोनसरी येथील सीबीएसई शाळा आणि सोमनपल्ली येथील लॉयड्सच्या कर्मचारी वसाहत या प्रकल्पांचे भूमिपूजन  करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!