Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीआता निवडणूक निरीक्षकाची जबाबदारी राहुल कुमार यांचेकडे…-देसाईगंज सुरक्षा कक्षाची पाहणी…

आता निवडणूक निरीक्षकाची जबाबदारी राहुल कुमार यांचेकडे…-देसाईगंज सुरक्षा कक्षाची पाहणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून आता राहुल कुमार (भा.प्र.से.)यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी श्री अनिमेष कुमार पराशर हे सामान्य निरीक्षक म्हणून जबाबदारी पाहत होते.  

निवडणूक निरिक्षक राहुल कुमार सर्किट हाऊस कॉम्पलेक्स येथील मार्कंडा कक्षात मुक्कामी राहणार असून त्यांचा मोबाईल क्रमांक- ९४२००६७६२६ आहे. तसेच कार्यालयीन संपर्क क्रमांक- ०७१३२-२२२०२४ असा आहे.त्‍यांच्याकडे निवडणूक विषयक कामकाजासंदर्भातील तक्रारी प्रत्यक्ष भेटून सकाळी ११ ते १२  या वेळेत देता येतील किंवा मोबाईलवर संपर्क साधता येईल.

राहुल कुमार आज गडचिरोली येथे रूजू झाले. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.राहुल कुमार यांनी निवडणुक निरीक्षक म्हणुन रुजू होताच आरमोरी विधानसभा मतदारसंघात भेट निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली.त्यांनी देसाईगंज येथील तहसिल कार्यालयातील सुरक्षा कक्षाची पाहणी करुन स्ट्रॉंग रूमच्या सभोवताची सिसीटीव्ही कॅमेरे,विद्युत व्यवस्था,पोलीस सुरक्षा, अग्निशामक यंत्र,ईव्हीएम साठवणूक कक्ष इत्यादी व्यवस्थेबाबत आढावा घेतले.याप्रसंगी सहायक निवडणूक अधिकारी मानसी तसेच देसाईगंज तहसिलदार प्रिती डुडुलकर,प्रशांत गड्डम तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!