Sunday, May 31, 2026
Homeब्रम्हपुरीआता तुम्हीच सांगा..! पायातील 'चप्पल' कुठे चोरायचीच हो कां? - ब्रम्हपुरीत चप्पलचोरांचा...

आता तुम्हीच सांगा..! पायातील ‘चप्पल’ कुठे चोरायचीच हो कां? – ब्रम्हपुरीत चप्पलचोरांचा धुमाकूळ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे,मान्य करू.पण,बेरोजगारी वाढली म्हणून चोरीच्या मार्गाचा अवलंब करणे कितपत योग्य आहे.अश्यातच आपण छोटे-मोठ चोर बघितले असतील,पण दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी बाजूला काढून ठेवलेल्या पायातील चक्क ‘चप्पल’ चोरीला जात असल्याचा प्रकार नुकताच ब्रम्हपुरी शहराच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून उघडकीस आला आहे.
ब्रम्हपुरी शहरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.शहरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावर आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरीचा महाराजा गणेश मंडळ,पाण्याच्या टाकीच्या बाजूला स्वर्गीय खानोरकर यांच्या प्रेरणेतील सार्वजनिक गणेश मंडळ व नेवजाबाई हितकारणी या तिन्ही मंडळांनी आकर्षक देखावे तयार केले आहेत.याशिवाय,सायंकाळच्या सुमारास मेला पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गर्दी होत असते.तिन्ही मंडळांचे उपक्रम यंदा चर्चेत आहेत. सायंकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यासह देसाईगंज व इतर परिसरातील नागरिक आकर्षक देखावे तसेच मेला पाहण्यासाठी ब्रम्हपुरी शहरात मोठ्या प्रमाणावर दाखल होतात व मंडपातील गणेशमूर्तीचे दर्शन घेतात.यावेळी मंडपाच्या बाहेर चप्पल व जूते काढून ठेवावे लागते. अश्यावेळी अज्ञात चप्पलचोर युवक नागरिकांनी चप्पल व जूते काढून ठेवलेल्या जागेवर जाऊन काहीकाळ गप्पा मारून चांगली चप्पल वा जुत्यांचे निरीक्षण करून डल्ला मारण्याचा प्रकार सुरू झाल्याने याचे नवल वाटत आहे. आता तुम्हीच सांगा..! पायातील ‘चप्पल’ कुठे चोरायचीच हो कां? असे असले तरीही चप्पलचोर त्याचे काय करत असावे? सदरचे चप्पलचोर एखाद्या दुकानदाराकडे उच्च प्रतीच्या चप्पल वा जूते विक्री करत असावे,असा अंदाज बांधणे चुकीचे ठरणार नाही.कारण की,चप्पल आणि जुत्यांची चोरी करून दररोज पायात घालून घरी तर ठेवणार नाही.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एमडी ड्रग्सची तस्करी; आरोपीकडून साडेसात किलो ड्रग्स जप्त.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज,रविवार ३१ मे रोजी मोठी कारवाई करत एका तरुणास अटक करून त्याच्याकडून तब्बल ७ किलो ५०० ग्रॅम...

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू; वन विभागात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम/सिंदेवाही(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक(ता.सिंदेवाही) येथील शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू...

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने...

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!