Friday, September 11, 2026
Homeमुंबईआता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला आहे.त्यातच आज,सोमवार १७ मार्चला राज्यातील नव्या वाळू धोरणाबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.सर्वप्रथम भाजप नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाळू धोरणाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते.मुनगंटीवारांच्या या प्रश्नांवर नव्या वाळू धोरणानुसार अर्ज केल्यापासून १५ दिवसांत तहसीलदारांनी घरकुलधारकांना वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत आहोत.१५ दिवसांत वाळू उपलब्ध न केल्यास तहसीलदारांवर कारवाई केली जाईल.नव्या वाळू धोरणात हे नमूद असेल,तसेच तक्रारीसाठी निश्चित एक पोर्टल तयार केले जाईल, अशीही माहिती बावनकुळे यांनी दिली.येत्या ८ दिवसांत नवे वाळू धोरण लागू करण्यात येणार असून घरकुलांना ५ ब्रास मोफत वाळू दिली जाईल,असेही त्यांनी म्हटले.भंडारा जिल्ह्यातील महसूल खात्यातील अधिकारी बेजबाबदार आणि निष्काळजीपणे वागत असल्याचाही प्रश्न उपस्थित झाला होता.त्यावर, संपूर्ण अधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्याची वाट लावली आहे, त्यांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करू,असे आदेशच महसूल मंत्र्यांनी दिले आहेत.तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बोलून गृह खात्याचीही चौकशी लावू,असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!