Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीघरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी 'पीएम सूर्यघर मोफत वीज योजना'...

घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
सौर विद्युत प्रकल्प एकदा बसवल्यानंतर त्यातून २५ ते ३० वर्षापर्यंत सौर विद्युत निर्मिती करता येते.एक किलोवॅट प्रकल्पासाठी स्थानिक उपलब्धतेनुसार सुमारे ६० ते ७० हजार रुपये पर्यंत खर्च येतो,त्यात ३० हजार रुपये अनुदान शासनाकडून मिळणार आहे. याशिवाय,सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी अनेक बँकांतर्फे कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे, त्यामुळे आर्थिक अडचण असलेल्या नागरिकांसाठीही ही योजना सहजरित्या सोप्या पद्धतीने राबवता येणार आहे.नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन वीज बचत आणि उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घ्यावा,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
योजनेची वैशिष्ट्ये आणि अनुदानाची रचना👇
एक किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पासाठी – ३० हजार रुपये अनुदान
दोन किलोवॅटसाठी – ६० हजार रुपये अनुदान
तीन किलोवॅटसाठी – ७८ हजार रुपये अनुदान
जिल्हाधिकारी यांनी पीएम सूर्यघर योजना तसेच कुसुम-बी सौर कृषी पंप योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आज सोमवारी आढावा घेतला.यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर आणि कार्यकारी अभियंता सचिन कोहाड उपस्थित होते.त्यांनीही सौरऊर्जा प्रकल्पांच्या तांत्रिक बाबी आणि नागरिकांसाठीच्या सुविधांबाबत माहिती दिली.
अर्ज प्रक्रिया👇
१.ऑनलाइन नोंदणी – अधिकृत पोर्टलवर (https://pmsuryaghar.gov.in/) अर्ज भरावा.
२.दस्तऐवज अपलोड – मालमत्तेचा पुरावा,वीजबिल आणि ओळखपत्र आवश्यक.
३.पडताळणी व अनुदान मंजुरी – पात्र अर्जदारांना अनुदान मंजूर होईल.
४. सौर पॅनेल बसवणे – अधिकृत एजन्सीद्वारे सौरऊर्जा प्रणाली बसवली जाईल.
अधिक माहिती आणि मदतीसाठी नागरिकांनी स्थानीय वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!