Saturday, May 2, 2026
Homeनागपूरआठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक..

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षीय दोन चिमुकल्या मुलींना खड्याचे घर दाखविण्याचे आमिष देत आरोपीने दोनपैकी एका मुलीवर अत्याचार केला असल्याची घटना काल,शनिवारी  २८ डिसेंबरच्या दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहरात उजेडात आली.याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.रवींद्र गणपत पसारे वय ३२ वर्षे,रा. भिवापूर असे आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार,आठ वर्षीय सोनू आणि मोनू (काल्पनिक नाव) या चुलत बहिणी काल शनिवारी  दुपारी घराशेजारी खेळत होत्या.तर आरोपी रवींद्र तेथे सायकल फिरवत होता.दरम्यान,आरोपी रवींद्रने सोनू आणि मोनूला ‘तुम्हाला खड्याचे घर दाखवतो’, असे सांगत त्यांना आपल्या घरी नेले.स्वयंपाकघरात चटई टाकत दोघींनाही त्यावर झोपायला सांगितले.या प्रकारामुळे घाबरलेली मोनू तेथून घराकडे पळत गेली तर सोनू तेथेच थांबून होती.आरोपीने चिमुकल्या सोनूशी लगट साधत तिच्याशी शारीरिक विकृत चाळे सुरू केले तर पळत गेलेल्या मोनूने थेट सोनूचे घर गाठत तिच्या आईला रवींद्रच्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर पाठोपाठ सोनूसुद्धा घाबरलेल्या अवस्थेत घरी पोहोचली व घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. तक्रार प्राप्त होताच,पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली.
पोलिसांचा कुटुंबीयांना आधार👇
घटना पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर विकृत मनोवृत्तीला कारवाईचा पोलिसी खाक्या दाखविण्यासाठी लागलीच पाऊल उचलले.पीडिता अतिशय लहान असल्यामुळे नाहक बदनामी होण्याच्या भीतीपोटी प्रारंभी कुटुंबीय धास्तावले होते. मात्र,ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी पीडितेच्या कुटुंबियांना हिंमत देत विकृत मनोवृत्तीविरोधात पुढे येण्यास प्रेरित केले.पीडितेच्या आईकडून तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.घटने प्रकरणी पुढील तपास प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक अग्रवाल करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!