Friday, October 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून पावसाचा जोर वाढणार..

आजपासून पावसाचा जोर वाढणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-विश्रांती घेतलेला पाऊस परत पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,आज शनिवार १५ ऑगस्ट रोजी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे.विशेषतः आज संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज असून बुलढाणा, अकोला,अमरावती,वाशीम,यवतमाळ,वर्धा,नागपूर, चंद्रपूर,गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.त्याचबरोबर,उद्या रविवारीही विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. अमरावती,अकोला,नागपूर,भंडारा आणि गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांसाठी रविवारीही ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.तसेच,रायगड आणि साताऱ्याच्या घाट परिसरासाठी रविवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने तिथेही ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,काल शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत राज्यातील सर्वाधिक तापमान ३४.२ अंश सेल्सिअस चंद्रपूर येथे नोंदवले गेले.तर,सर्वांत नीचांकी तापमान महाबळेश्वर येथे १७.५ अंश सेल्सिअस इतके होते.तसेच, घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात पावसाचा सर्वाधिक जोर विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पाहायला मिळणार आहे. शहरी भागांसाठी कोणताही मोठा अलर्ट नसला,तरी घाट परिसर आणि विदर्भातील नागरिकांनी सतर्क राहावे,असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास पाच वर्षाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुकामेटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी ४३ वर्षीय शिक्षक...

श्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर येथे पालक सभा,श्रमदान,सत्कार व विविध...

कारवाईच्या भीतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई पसार.. -प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजाराची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध...

गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी निर्बंध; डीजे व अतितीव्र ध्वनी उपकरणांच्या वापरास बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सण,उत्सव,मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!