Saturday, May 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज २०२६-२७ वर्षातीलअर्थसंकल्प सादर; मोटारसायकल,मोबाईल फोन स्वस्त तर दारू,सिगारेट महाग..

आज २०२६-२७ वर्षातीलअर्थसंकल्प सादर; मोटारसायकल,मोबाईल फोन स्वस्त तर दारू,सिगारेट महाग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.आज,रविवार १ फेब्रुवारी रोजी संसदेत देशाचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.आजचा अर्थसंकल्प पकडुन सीतारामन यांनी तब्बल नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.अर्थसंकल्प सादर करतांना गरिबी निर्मूलनासाठी सरकारने केलेल्या कामांचा गौरव केला.जीएसटी प्रक्रिया अधिक सोपी करणे आणि रोजगाराच्या संधी वाढवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात काहींना फटका तर काही जणांना झटका बसला आहे.विशेष म्हणजे,गुटखा,सुगंधित तंबाखू व दारु शौकिनांना शॉक बसला आहे.अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी काही सवलती आणि उद्योगांना बळकटी देण्यासाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षणासाठी मुलींची वसतिगृह उभारणार,मुंबईत एबीजीसीची कंटेट क्रिएटिव्ह लॅबपशुवैद्यकीय आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्यडिझाईन क्षेत्राला चालना
नवे सांस्कृतिक केंद्र उभारणार ९५ देशांची कॅट परिषद भारतात २० पर्यटन केंद्रांवर गाईड्स आर्थिक विकासासाठी ६ प्रमुख क्षेत्रांवर भर आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारने ६ क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम प्रस्तावित केले आहेत.
शेतकऱ्यांसाठी नारळ संशोधन केंद्र स्थापन करणार- तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ पशूपालन दुग्धव्यवसायासाठीचे अनुदान वाढवणार काजू, कोको ब्रँड जागतिक दर्जा मिळवून देणार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न ५०० एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन अधिक मजबूत करणारचंदन, नारळ आणि काजू या पिकांना चालना देणारईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाण्याचे उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भरचंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यात येईल.आयातीवर अवलंबत्व कमी करणारमत्स्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणारसागरी किनारपट्टी आणि इशान्येकडील शेतकऱ्यांना मदत करणारशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवे पर्याय तपासणार.
इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म अधिक सोपा केला जाणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवा उत्पन्नकर कायदा लागू होणार आहे. नव्या कायद्यानुसार तांत्रिक त्रुटींसाठी शिक्षा न देता दंड आकारला जाणार आहे.लहान कर उल्लंघनांमध्ये केवळ दंड आकारला जाईल.परदेश प्रवासावर आकारला जाणारा कर कमी करण्यात आला आहे. परदेश प्रवासासाठी टीसीएस दर ५ टक्के करण्यात आला आहे.३१ जुलैपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार आहे.नव्या कायद्यात अघोषित उत्पन्नाची मर्यादा १ कोटी रुपयांपर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
  • स्वस्त झालेले- मोबाईल फोन,ईव्ही बॅटरी,सौर पॅनेल,अपघात विमा,वैद्यकीय उपकरणे, मोटारसायकल,भारतात तयार कपडे,मधुमेहाची औषधे,कॅन्सरची औषधे,क्रीडा साहित्य,परदेश प्रवास,लिथियम आयन बॅटरी,ईव्ही वाहने,ईव्ही लिथियम बॅटरी,फ्रोझन मासे,एलसीडी, एलईडी.
  • महाग झालेले– गुटखा,सुगंधित तंबाखू,दारु, पीव्हीसी फ्लेक्स शीट्स,जूते(बूट),खनिजे, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले,भंगार.
  • घोषणा👇
५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर-२ आणि ३ शहरांच्या विकासासाठी ₹११.२ लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहे.२०२६-२७ मध्ये ही रक्कम १२.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल.
सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील.
एक जिल्हा,एक उत्पादन याला प्रोत्साहन दिले जाईल
महात्मा गांधी ग्राम स्वराज खादीला प्रोत्साहन देण्यासाठी- उत्पादन,प्रशिक्षण आणि विपणनासाठी असेल.
क्रीडा-उपकरणे डिझाइन आणि उत्पादन करण्याची योजना आहे.
औद्योगिक समूह- पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे.
मुंबई ते पुणे,पुणे ते हैदराबाद,हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई आणि सिलिगुडी ते वाराणसी यासह सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील.
राष्ट्रीय हातमाग धोरण कारागिरांना प्रोत्साहन आणि समर्थन प्रदान करेल.शैक्षणिक संस्थांकडून तांत्रिक सहाय्य शक्य होईल.मेगा टेक्सटाइल पार्क स्थापन केले जातील.
एमएसएमईसाठी- सूक्ष्म उद्योगांना मदत करण्यासाठी स्वावलंबी भारत निधी तयार केला जाईल.
सरकारी संस्थांना अल्पकालीन मॉड्यूलर अभ्यासक्रम डिझाइन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.टियर २ आणि ३ स्तरांपर्यंत प्रशिक्षण दिले जाईल.
मालवाहतुकीसाठी मालवाहतूक कॉरिडॉर बांधले जातील.
देशातील सीप्लेन उत्पादकांना पाठिंबा दिला जाईल.
खासगी विकासकांसाठी पायाभूत सुविधा जोखीम हमी निधी तयार करण्यात आला आहे. सरकार अंशतः हमी देईल.
विकसित भारतासाठी एक उच्चस्तरीय बँकिंग समिती स्थापन केली जाईल.
मालवाहतुकीसाठी एक समर्पित फ्रेट कॉरिडॉर बांधला जाईल.पूर्वेकडील दानकुनी ते पश्चिमेकडील सुरत या बंदराला जोडण्याची योजना देखील आहे.
वाराणसी आणि पटना विकसित करून अंतर्गत जलमार्ग विकसित केले जातील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंधन दरवाढीचा थेट परिणाम आता शेतीच्या कामांवर..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी व मजुरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची...

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!