Thursday, October 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज 'या' जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले.यात जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील कुर्झे परिसर हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची नोंद भारतीय भूकंपमापक संस्थेने केली आहे.भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे ७ किलोमीटर खोलीवर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तलासरी,धुंदलवाडी,मोडगाव आणि कासा परिसरात भूकंपाचे हादरे बसले.बऱ्याच कालावधीपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात सौम्य ते जास्त तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.पालघर जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी परिसरात भूकंपाच्या घटनांची वारंवारता लक्षात घेता प्रशासनाने या परिसरातील भूकंपाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.भूकंपाच्या धक्क्याने जमीन अचानक हादरल्याने नागरिक घाबरले व घराबाहेर पळाले.यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही; मात्र वारंवार होणाऱ्या कंपनाने नागरिक काहीकाळ दहशतीखालील जीवन जगू लागले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर...

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी; तेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदानापासून राहणार दूर.. – १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उद्या,शुक्रवार ९ ऑक्टोंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून २३ ऑक्टोंबर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!