- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज,सोमवार ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय मिळालेले गुण पाहता येणार आहे.तसेच सदर माहितीची प्रिंट काढता येईल.त्याचप्रमाणे डिजिलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवता येणार आहे.यंदा या परीक्षेसाठी ९ विभागीय मंडळांतून राज्यभरात १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.८ लाख २१ हजार ४५० मुले,तर ६ लाख ९२ हजार ४२४ मुली होत्या.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती.अशातच आज निकाल असल्याने मी पास होणार की,नाही? मला अपेक्षेपेक्षा कमी टक्केवारी मिळाली तर..आई-वडील रागावणार,आता काय करू? पुढे काय करावे,असे नाना तऱ्हेचे विचार अनेक विद्यार्थ्यांच्या मनात घर करून सोडत असतात.काहीजण टेन्शन घेऊन टोकाचेही पाऊल उचलत असतात.मात्र,आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की,टेन्शन नहीं लेने कां,जे होणारं भविष्य आहे; ते होणारच.तुम्ही जेवढे परिश्रम घेतले,त्याचे फलित मिळणारच,यात कसलीही शंका नाहीच.तुम्ही मनात आणले तर सर्वकाही करू शकता.त्यासाठी पक्का निर्धार आणि सातत्य असणे गरजेचे आहे.जो मार्ग तुम्ही निवडाल त्यात तुम्ही एकदा कां गुंतले तर जीत तुमची पक्कीच आहे.परत एकदा तुम्हाला खास निकाल लागण्यापूर्वी सांगावेसे वाटते की,आम्ही शालेय शिक्षण घेत असतांना स्पर्धा परीक्षा काय असते,त्यासाठी काय करावे लागते.हे सांगणारे कुणीही नव्हतेच.केवळ स्पर्धा परीक्षाच नाही तर विविध क्षेत्रात तुम्ही आपले करियर करू शकता.स्वतःला कमजोर समजू नका.मात्र,तुम्हाला काय बनायचे आहे,हे तुमच्यावर डीपेंड करते.आम्ही शिक्षण घेत असतांना आम्हाला वाटायचे की,कलेक्टर, पोलीस अधिकारी,एसडीओ,बडीओ,तहसीलदार मोठे हुशार व पहिल्या क्रमांकात पास होणारे अधिकारी असावेत,असे वाटायचे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून शिक्षण घेत जाणे आणि टवाळक्या करणे,अशी दिनचर्या सुरू होती.मात्र,आता आम्हाला कळले की,कित्तेक मोठ-मोठे अधिकारी हे शालेय जीवनात नापास झालेले असून कुणाला कमी टक्केवारी तर कुणी एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा नापास होऊन हार न मानता अधिकारी बनलेले आहेत.खरंतर यूपीएससी (UPSC) परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. अनेक विद्यार्थी आयएएस (IAS)आणि आयपीएस (IPS) अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात.अनेकजण आयएएस आणि आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न देखील पूर्ण करीत आहेत. विशेष म्हणजे,काही विद्यार्थी शाळेत नापास झाले,तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. अश्याच प्रकारे आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनावर ‘१२ वी फेल’ नावाचा चित्रपट बनला आहे. मनोज शर्मा हे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस(IPS-Indian police service-भारतीय पोलीस सेवा) अधिकारी आहेत.ते नववी आणि दहावीमध्ये कसेतरी पास झाले.बारावीमध्ये हिंदी सोडून ते सर्व विषयात नापास झाले.गरिबीमुळे ते फुटपाथवर झोपले.त्यांनी टेम्पो चालवला आणि लायब्ररीमध्ये, पिठाच्या गिरणीत काम केले.मनोज शर्मा यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास केला.दिल्लीमध्ये लायब्ररीमध्ये काम करीत असतांना त्यांनी यूपीएससी(UPSC-Union public service commission-केंद्रीय नागरी सेवा)परीक्षेची तयारी केली.२००५ मध्ये चौथ्या प्रयत्नात ते आयपीएस अधिकारी बनले.त्यांचा यूपीएससी मध्ये १२१ रँक मिळवला.
अनेक परीक्षांमध्ये नापास होणारे आयएएस(IAS-Indian Administrative service-भारतीय प्रशासकीय सेवा) अवनीश शरण सोशल मीडियावर
खूप सक्रिय असतात.ते बिहारचे आहेत.अवनीश शरण शाळेत नापास झाले नव्हते.पण,त्यांना चांगले मार्क्स मिळत नव्हते.त्यांनी १० वी मध्ये फक्त ४४.७% गुण मिळवले.१२ वी मध्ये ६५% आणि ग्रेजुएशनमध्ये ६०% गुण मिळवले.ते एक सामान्य विद्यार्थी होते. शाळेत नाही,पण अवनीश राज्य प्रीलिम्स परीक्षेत १० वेळा नापास झाले.त्यानंतर त्यांनी यूपीएससीवर लक्ष केंद्रीत केले.पहिल्या प्रयत्नात ते इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले,पण अयशस्वी झाले.दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी चांगला रँक मिळवला आणि २००९ मध्ये आयएएस बनले.त्यामुळे हार मानू नका,टेन्शन घेऊ नका,मात्र आपले ध्येय निश्चित करून पुढे जा.तुम्हाला काय बनायचेय ते अगोदर ठरवा आणि त्यानुसार तयारीला लागा.
‘या’ ठिकाणी पाहू शकता निकाल👇
- Advertisement -

