- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बँकांना सलग तीन दिवस सुट्ट्या राहिल्याने अनेकांचे बँकेशी होणारे व्यवहार ठप्प पडले आहेत.विशेष म्हणजे,काहींचे चेक बँकेत अडकून पडले आहेत.तर काहींना पैसा असूनही मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.अश्यातच शनिवार,रविवार आणि सोमवारच्या सुट्ट्या नंतर आज,मंगळवार २७ जानेवारी रोजी बँका सुरू राहणार की बंद राहणार?अश्या संभ्रमात अनेकजण पडले आहेत.त्यातच,बँकांची बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना सुट्टी जाहीर केलेली नाही,तर आज मंगळवारी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ (युएफबीयु)देशभर बँक संप करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे आज मंगळवारी अनेक ठिकाणी बँक शाखा बंद राहू शकतात आणि ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.यात देशातील सर्व प्रमुख सरकारी बँकांचा समावेश असेल.यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया,कॅनरा बँक,पंजाब नॅशनल बँक,बँक ऑफ बडोदा,इंडियन बँक यांसह इतर सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश आहे.अनेक शहरांमध्ये कर्मचाऱ्यांनी आधीच निदर्शने सुरू केली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी
पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा ही प्रमुख मागणी असल्याने सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्यतेचे ठणार आहे.’युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ हे ९ प्रमुख बँक युनियन्सचे संयुक्त व्यासपीठ आहे.ही संघटना सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही जुन्या खाजगी बँकांच्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते.संपामुळे देशातील अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये बँकेचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- Advertisement -

