Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज अवकाळी पावसाचे गडचिरोलीसह चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट.. - विजांच्या कडकडाटासह...

आज अवकाळी पावसाचे गडचिरोलीसह चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट.. – विजांच्या कडकडाटासह वादळी वारे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील विदर्भात गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवित उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता आहे.तर मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील.
तसेच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आज,शनिवार २२ मार्चला गडचिरोली,चंद्रपूर, गोंदिया, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तर यवतमाळ,नागपूर, वर्धा,भंडारा जिल्ह्यांना पावसाचा ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.पुढील दिवस अवकाळी पावसाचा इशारा आणि गारपिटीची शक्यता असल्यामुळे अवकाळीचा शेत पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.कोकणातील जिल्ह्यांत आज काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहील.महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण होत असतांनाच केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने पूर्व मध्य भारत,उत्तर पूर्व भारत आणि अरुणाचल प्रगेशात उद्या २३ मार्च रोजी ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवत २० ते २३ मार्चदरम्यान या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.पुढील चार ते पाच दिवसांमध्ये उत्तर पश्चिम भारतामध्ये कमाल तापमान ३ ते ५ अंशांनी वाढणार असल्याचा इशारा आयएमडीने(IMD)जारी केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!