- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात “आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे लक्ष देऊन तिला उच्च शिक्षण द्या”, असे लिहिले आणि गळफास घेऊन संपूर्ण आयुष्यातील कटकटीची यात्राच संपवल्याची घटना काल गुरुवारी नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.दादाजी नियोजित किनकर वय २५ वर्षे, रा.राजुरवाडी,ता.घाटंजी,जि.यवतमाळ असे आत्महत्या केलेल्या मृत वकिलाचे नाव असून ते सध्या फुटाळा गल्ली क्र.५ गजानन मंदिराच्या जवळील लक्ष्मी भलावी यांच्या घरी किरायाने वास्तव्यास होते.
दादाजी किनकर यांनी एलएलबीचे शिक्षण यवतमाळमधून पूर्ण केले होते.त्यानंतर नागपुरातील एका नामांकित वकिलाच्या कार्यालयातून वकिली व्यवसाय सुरू केला.काही दिवसांपासून किनकर हे मानसिक तणावात होते.मात्र,कार्यालयातील कनिष्ठ वकिलांच्या ते लक्षात आले नाही.बुधवारच्या रात्री दादाजी यांनी जेवण केले आणि झोपले.काल गुरुवारी आईने दादाजी यांना फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे त्यांनी ही बाब पतीला सांगितली.दोघांनीही अनेकदा मुलाला फोन केला. मात्र,दादाजी फोन उचलत नव्हते.त्यामुळे त्यांनी घरमालक महिलेला फोन केला.तिने खोलीत डोकावून पाहिले असता दादाजी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.तिने लगेच दादाजीच्या आई-वडिलांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून आत्महत्या करण्यामागील नेमके कारण काय असावे,याचा शोध सुरू केला आहे.
- Advertisement -

