- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोरची(गडचिरोली):-कोरची तालुक्यात अस्वलाने धुमाकूळ घातला असून अस्वलाच्या हल्ल्यात एकाच दिवसात तिघे जखमी झाले असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काल,शुक्रवारी सकाळी ८ वाजता कोरची तालुक्यातील गडेली गावालगत असलेल्या कक्ष क्रमांक ४५६ मध्ये अस्वलाने ३ लोकांवर हल्ला केल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच गडेली गावात जावून तिन्ही जखमींना शासकीय वाहनाद्वारे कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ भरती करण्यात आले. अस्वलाच्या हल्ल्यात चम्मा पंडी नैताम वय ५५ वर्षे, रा. गडेली हा इसम गंभीररित्या जखमी झाला.त्याच्या डोके,उजवा हात तसेच डाव्या पायाला गंभीर जखमा झाल्या.तर महादू सीताराम कोरेटी वय ५८ वर्षे,रा. गडेली याच्या उजव्या हाताला किरकोळ स्वरूपाची जखम झाली.दुसऱ्या घटनेत रामसिंग पलटन सोनकुकरा वय ५५ वर्षे, रा.टेमली याच्यावरसुद्धा अस्वलाने हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केले.सदर घटना ही शेतमालकाच्या शेताला लागून असलेल्या जंगलामध्ये घडली.त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी किरकोळ जखमा आढळल्या.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चम्मा पंडी नैताम हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.सदर घटनांचा पंचनामा करतेवेळी बेडगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम. ठाकरे,क्षेत्र सहायक एस. एन. राठोड,गडेलीचे वनरक्षक एस.बी.भिमटे,कालापाणीचे वनरक्षक पी.एम.मगरे, जितेंद्र राऊत उपस्थित होते.
- Advertisement -

