Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोलीअवैध वाळू उत्खनन प्रकरणी आमदार मसराम यांचे मुंबईत महसूलमंत्र्यांना साकडे..!

अवैध वाळू उत्खनन प्रकरणी आमदार मसराम यांचे मुंबईत महसूलमंत्र्यांना साकडे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्वत्र चेक पोस्ट  उभारून अवैध वाळू वाहतुकीला अटकाव केला आहे. अश्यातच काही मुजोर रेती तस्कर पैश्याच्या जोरावर बेधडकपणे अजूनही अवैध रेतीची वाहतूक करतांना दिसून येत आहेत.रेती तस्कर तसेच त्यांना साथ देणारे अधिकारी,कर्मचारी यांना शासनाच्या महसुलात वाढ व्हावी,असे कदापिही वाटत नसल्याने ‘आम भरो पोट भरो’ अशी हल्ली अवस्था निर्माण झाली आहे.त्यामुळे
आरमोरी विधानसभा क्षेत्रात विशेष करून देसाईगंज व आरमोरी तालुक्यात अवैध रेती उत्खननाचे प्रमाण वाढले असून,त्यामुळे पर्यावरणीय हानीबरोबरच शासनाच्या महसुलालाही फटका बसत आहे.या अनियमिततेविरोधात त्वरित कार्यवाही व्हावी,यासाठी आमदार रामदास मसराम यांनी मुंबईच्या मंत्रालयात जाऊन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत चर्चा केली.सोबतच जिल्ह्यातील आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची ई-पिक नोंदणीस मुदतवाढ देण्यात यावी,अशी ठोस मागणी केली.अनेक शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे नोंदणीस विलंब झाल्याने,त्यांना याचा आर्थिक फटका बसू नये म्हणून ही मुदतवाढ अत्यावश्यक असल्याचे आमदार मसराम यांनी स्पष्ट केले.या दोन्ही विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देतांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना आवश्यक ती कार्यवाही व सूचना देण्याचे निर्देश दिले असल्याचे आमदार मसराम यांनी कळवले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!