Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीचिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे उघडणार टप्प्याटप्प्याने.. - जनतेने आवश्यक ती खबरदारी...

चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे उघडणार टप्प्याटप्प्याने.. – जनतेने आवश्यक ती खबरदारी घ्यावी; प्रशासनाचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे येत्या,रविवार १ जून २०२५ पासून पाण्याच्या येव्यानुसार टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहेत.हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून सुरू झाल्याने आणि पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.बॅरेजमध्ये साठवलेला पाणीसाठा कमी करण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने कळवले आहे.
चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झाले असून,त्याची एकूण लांबी ६९१ मीटर आहे.यामध्ये १५ मीटर लांब आणि ९ मीटर उंचीचे असे एकूण ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी १५ ऑक्टोंबर २०२४ पासून हे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते.सद्यस्थितीत,२७ मे २०२५ रोजी चिचडोह बॅरेजमधील पाणी पातळी १८३.०० मीटर असून,जिवंत पाणी साठा ५३.५२ दशलक्ष घनमीटर इतका आहे.या नियोजनानुसार,१ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजता प्रकल्पाच्या उभ्या उचल द्वारातून (River Sluice) ८८.०४ क्युमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.यामुळे नदीच्या खालील भागातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.या वाढत्या पाणी पातळीमुळे कोणतीही जीवित व वित्त हानी होऊ नये,यासाठी नदीलगतच्या सर्व गावांना आणि ग्रामपंचायतींना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.नागरिकांनी या कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे,तसेच नदीकाठावरील शेतात काम करताना योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विशेषतः, मार्कंडा देवस्थान येथील नदीवर स्नान करणारे यात्रेकरू,मासेमारी करणारे नागरिक, नदीघाटातून वाळू काढणारे,पशुपालक आणि नदीतून ये-जा करणाऱ्या सर्व जनतेने आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन चिचडोह बॅरेज प्रशासनाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!