Wednesday, September 30, 2026
Homeचंद्रपूरअवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय ४२ वर्षे,रा.अष्टभुजा वॉर्ड,चंद्रपूर आणि नितीन मनराज कातकर वय ३९ वर्षे,रा.घोडपेट सायवन, ता.भद्रावती,जि.चंद्रपूर यांना ताब्यात घेण्यात आले असून वाहनांसह रेती असा एकूण ५१ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत हे एसडीपीओ कार्यालय व बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या पथकासह बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पोंभूर्णा मार्गाने एमएच ३४ सीक्यू ९९९६ व एमएच ३६ एए ८७०० क्रमांकाचे दोन हायवा ट्रक येतांना दिसून आले. येणाऱ्या दोन हायवांवर संशय आल्याने जुनोना परिसरात त्यांची तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान दोन्ही हायवांमध्ये रेती भरलेली आढळून आली.सदर रेतीची वाहतूक अवैध पद्धतीने केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुमार सुशांत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दोन्ही हायवा ट्रक ताब्यात घेतले व पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली.या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

कुष्ठांतेयांची तालुका स्तरावर ११ सदस्यीय कार्यकारिणी गठित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,भिसी येथे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या माध्यमातून २८ सप्टेंबर रोजी कुष्ठांतेयांची सभा आयोजित करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी...

सावधान..! वनविभागातील नोकरीचे आमिष पडू शकते महागात.. – वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांची भरती आणि नियुक्ती शासनाच्या विहित नियमांनुसारच..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील विविध भागांत काही व्यक्ती वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांवर नियुक्ती करून देण्याचे खोटे आमिष दाखवून उमेदवारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!