Tuesday, September 1, 2026
Homeकुरखेडाअवैध रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त -कुरखेडा तहसील कार्यालयाची धडक कारवाई…

अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त -कुरखेडा तहसील कार्यालयाची धडक कारवाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :- जिल्ह्यात अवैध रेतीचा धंदा जोमात सुरू असून अवैध रेतीच्या माध्यमातून अनेकजण बलाढ्य झालेले दिसून येत आहेत.कितीही कारवाई केली तरीही कारवाईला न जुमानता रेती चोरी तितक्याच ताकदीने केली जात आहे.त्यामुळे कुरखेडा येथे अवैध रेती उपसा करणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबवित रात्री सती नदी पात्रातून विनापरवाना रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय कुरखेडा येथे जमा करण्यात आले आहे.

कुरखेडा तालुक्यात रात्रौ अंधाराचा फायदा घेत सती नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून वाहतूक होत असल्याची बाब येथील नव नियुक्त तहसीलदार रमेश कुंभरे यांच्या निदर्शनास आली होती.नायब तहसीलदार शाहिद शेख यांच्या नेतृत्वात भरारी पथक तयार करून रात्रौ सती नदी परिसरात गस्त लावली होती.अवैध रेती वाहतुकीस निर्बंध घालण्या करिता तयार केलेल्या पथकाच्या गस्ती दरम्यान गुरनोली तलाठी साजा. क्रमांक १ मधील अरत्तोंडी मार्गावर असलेल्या पोल्ट्री फार्म जवळ ११.३० वाजता १ ब्रास रेती भरून वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर आढळले.ट्रॅक्टर थांबवून चालक यास वाहतूक परवाना संदर्भात विचारणा केली असता परवाना नसल्याची बाबा चालक श्रीहरी पेंदाम रा. मेंढा, ता.कुरखेडा याने कबूल केल्याने सदर ट्रॅक्टरचा पंचनामा करून जप्ती करीत तहसील कार्यालय कुरखेडा येथे जमा करण्यात आले आहे.सदर कार्यवाही तहसीलदार रमेश कुंभरे यांच्या मार्गदर्शनात, नायब तहसीलदार शाहिद शेख यांच्या नेतृत्वात पथकातील मंडळ अधिकारी एल. बी. उसेंडी,  तलाठी बी.आर. महाका, तलाठी सी.एस. ठाकरे, यांचा सहभाग होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!