उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा खेळ सुरू आहे.अश्यातच आज,गुरुवार २ एप्रिल रोजी अवकाळीचा धोका कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या काळात वीज पडणे,जोरदार वारे आणि गारपिटीमुळे शेती,फळबागा आणि पशुधनाला नुकसान होऊ शकते.त्यामुळे शेतकरी बांधवांसह नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,आज गुरुवारी विदर्भातील वर्धा,गोंदिया,नागपूर,गडचिरोली,चंद्रपूर, भंडारा,यवतमाळ,बुलढाणा,अकोला,अमरावती,आणि वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,जालना,आणि बीडला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तसेच परभणी,हिंगोली, नांदेड,लातूर आणि धाराशीवाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव,धुळे,नंदुरबार आणि अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.सांगली,सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून येथे मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर,कोकण विभागातील मुंबई,सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.ठाणे,रायगड आणि रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अवकाळी पावसाचा धोका कायम; आज अनेक जिल्ह्यांना अलर्ट..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

