Thursday, October 22, 2026
Homeब्रम्हपुरीअभिनयाची छाप पाडत झिलबोडीच्या नाट्य कलावंताने गाजवली झाडीपट्टी नाट्यरंगभूमी.. - केशव लोखंडे...

अभिनयाची छाप पाडत झिलबोडीच्या नाट्य कलावंताने गाजवली झाडीपट्टी नाट्यरंगभूमी.. – केशव लोखंडे यांचा गावातील हौशी नाटकापासून ते व्यवसायीक नाटकापर्यंतचा अतुलनीय प्रवास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-चंद्रपुर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील ३०० लोकसंख्येची वस्ती असलेल्या झिलबोडी या छोट्याश्या गावखेड्यातील रहिवासी असलेले केशव नानाजी लोखंडे यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडत काही कालावधीतच झाडीपट्टीची अख्खी नाट्यरंगभूमी गाजवली आहे.लोखंडे यांनी १४ एप्रिल १९८९ ला ‘रक्ताची तहाण’ या नाटकापासुन सुरूवात करून आतापर्यंत विविध नाटकांत काम केले आहे. ‘रक्ताची तहाण’ या नाटकातील अभिनयाने रसिकजण भारावून गेले होते.नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून गाडीने जो रुळ पकडला,तो रुळावरून धावलेल्या गाडीला आजपर्यंत कुठेच थांबा मिळालेला नाही.केशव लोखंडे हे झाडीपट्टी रंगभूमीचे दिग्दर्शक तथा विनोदी नटसम्राट म्हणून प्रसिध्द आहेत.मधुरवाणी व मनमिळावू स्वभावामुळे ते चाहत्यांच्या दिलावर राज करू लागलेत.संगीत व्यथा एका जवानाची,घुंगरू,संभा वेलदार,गरीबाचा कैवारी-गरीबाचा रक्तपीता,रक्ताची तहान,पुढाऱ्याची ऐसी तैसी,सौभाग्यदान,आकित, नकोशी,औकात,वनवा पेटला क्रांतीचा,कां दिलं जन्म मला,असुनी नाथ मी अनाथ,ग्रहन लागलं घरट्याला, खबरदार मामाजी, आघात,महानाट्य मी योध्दा भिमा कोरेगावचा,रूसला पदर मायेचा अशा चंद्रपुर,भंडारा, गोंदिया,गडचिरोली व नागपुर जिल्ह्यात झालेल्या नाटकांत अभियाची छाप पाडून सकल झाडीपट्टी रंगभूमी गाजवली.नाट्यकलावंत ते दिग्दर्शकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती, पथनाट्य, कला पथक तसेच विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करून सामाजिक कार्यासह मनोरंजनात्मक कार्य करीत आहेत.केशव लोखंडे यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले असून नाटकांसह ते गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज(वडसा)पंचायत समितीत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!