Thursday, September 3, 2026
Homeगोंदियाअन् 'त्याने' चक्क वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याचीच दुचाकी नेली चोरून...

अन् ‘त्याने’ चक्क वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याचीच दुचाकी नेली चोरून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-चोरी करणारा चोर हा कधीच विचार करत नाही की,समोरील व्यक्ती आहे तरी कोण? त्याला त्याच्याशी कसलेही देणे-घेणे नसतेच.त्यामुळे ‘अपणा काम बनता’ असाच विचार त्याच्या मनात असतो व पुढील प्रयत्न जारी ठेऊन ‘साधली तर चेल्याची नाही तर चपाट्याची’ असे करीत असतो.अशातच असाच काहीसा प्रकार काल शनिवारी गोंदिया शहरातील मनोहर चौकात असलेल्या जिल्हा वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर घडला.एका अज्ञात चोरट्याने चक्क वाहतूक पोलिस नियंत्रण कार्यालयाच्यासमोर असलेल्या पार्किंगमधून वाहतूक विभागाच्याच कर्मचाऱ्याची दुचाकी चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली.चक्क पोलिस कार्यालयासमोरूनच दुचाकी चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बेशिस्त वाहतुकीवर लगाम लावण्याच्या उद्देशाने गोंदिया शहराच्या मनोहर चौकात जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय तयार करण्यात आले आहे. याठिकाणावरून संपूर्ण जिल्ह्यातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येते.या कार्यालयात आफरीन सलाउद्दिन शेख वय २९ वर्षे,रा.शिवाय कॉलोनी आंबाटोली फुलचूर हे कार्यरत आहेत.त्यांनी काल शनिवार १२ एप्रिल रोजी कार्यालयाच्या समोरील भागात असलेल्या पार्किंगमध्ये दुचाकी क्रमांक-एमएच १६,बीक्यू ११५१ ठेवली होती.त्यातच काही कालावधीनंतर त्या ठिकाणाहून दुचाकी अज्ञात चोरट्यानी चोरून नेली.चक्क वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याच्याच दुचाकीवर चोट्याची नजर होती कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!