Tuesday, August 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअन् 'तो' मुलगी बनून आला परिक्षा केंद्रावर-मेकअप पाहून परिक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आली...

अन् ‘तो’ मुलगी बनून आला परिक्षा केंद्रावर-मेकअप पाहून परिक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आली शंका-त्याची लबाडी पकडली; पोलिसांनी केली अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- पंजाबच्या फरिदकोट जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत एक ‘मुन्नाभाई’ पकडला गेला आहे. कोटकपुरातील परिक्षा केंद्रावर तो मुलगी बनून पोहोचला होता.अंग्रेज सिंह असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात राहणाऱ्या परमजीत कौरच्या जागी अंग्रेज सिंह परिक्षा देण्यास गेला होता.त्यानं डोक्यावर टोपी, कपाळावर टिकली, हातात लाल बांगड्या घातल्या होत्या.पंजाबी सूट परिधान करुन तो परिक्षा देण्यास गेला होता.

अंग्रेजच्या अंगठ्याचे ठसे बायोमॅट्रिक यंत्रावर घेण्यात आले.स्कॅनिंग दरम्यान तो पकडला गेला.बोगस आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र घेऊन परिक्षा देण्यास गेलेल्या अंग्रेजला पकडण्यात आले.अंग्रेज सिंहने परमजीत कौरच्या ओळखपत्रावर खोटा फोटो लावला होता.अंग्रेजची लबाडी पकडली गेली.याची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी अंग्रेजला अटक केली.यासोबतच परमजीत कौरचा अर्जदेखील बाद करण्यात आला.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून रविवारी आरोग्य कर्मचारी पदाच्या ८०६ पदांसाठी परिक्षा घेण्यात आली.या परिक्षेसाठी विद्यापीठाने फरिदकोट, फिरोजपूर आणि कोटकपुरामध्ये २६ केंद्रे तयार केली होती.या केंद्रांवर साडे सात हजार जण परिक्षा देण्यास पोहोचले.फरिदकोटमधील केंद्रावर एक तरुण मुलीच्या वेशात परिक्षा देण्यास पोहोचला.प्रेयसीचा पेपर देण्यास आलेल्या तरुणाचा मेकअप पाहून परिक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना शंका आली.त्यानंतर बायोमेट्रिक यंत्रामुळे तो पकडला गेला.

तरुणीच्या जागी पेपर देण्यासाठी आलेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून अंग्रेज सिंह असे त्याचे नाव आहे; अशी माहिती एसएसपी हरजीत सिंह यांनी दिली.परमजीत कौर नावाच्या तरुणाच्या जागी आरोपी परिक्षा देण्यास गेला होता.तिचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!