Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअन् तस्करांच्या मागे चक्क ऑटोरिक्षा घेऊन धावू लागले अधिकारी,कर्मचारी.....- गौण खनिजांच्या चोरीतील...

अन् तस्करांच्या मागे चक्क ऑटोरिक्षा घेऊन धावू लागले अधिकारी,कर्मचारी…..- गौण खनिजांच्या चोरीतील प्रकरण….चोरटे काही सापडेना…..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादक/सत्यवान रामटेके

उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या घडीला सगळीकडेच महसूल विभागाच्या गौण खनिजांची चोरी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.गौण खनिजांची चोरी करणारे चोरटे नवनवीन फंडे वापरून आणखी जोमाने व ताकतीने तस्करी करतांना दिसून येतात.मात्र अशातच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गही तस्करांपेक्षा काही कमी नसल्याचा प्रकार हल्ली निदर्शनास आला आहे.एका महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवून ‘असे-कसे सापडत नाही..! पकडल्या शिवाय राहणार नाही’….! असे ठरवून चक्क शासनाच्या गौण खनिजांची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी ऑटोरिक्षाच भाड्याने घेऊन तस्करांच्या मागे धावू लागले; मात्र चोरटे हातात लागले नसल्याने भाड्याने केलेल्या रिक्षाचा प्रयत्न असफल ठरला आहे. 

काही दिवसांपूर्वी गौण खनिजांची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे वृत्त दैनिक वृत्तपत्र, सोशल मीडिया,वेब न्युज पोर्टल व इतर ठिकाणी प्रकाशित होऊ लागले होते.त्यानुसार वरिष्ठांकडून एका महसूल विभागास ताकीद देऊन तस्करांवर कारवाई करण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. त्यानुसार कारवाई करण्याचा सपाटा सुरू करण्यात आला होता.महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गांनाही कळलेले आहे की,गौण खनिजांची चोरी करणाऱ्या तस्करांना त्यांची दुचाकी वाहन, चारचाकी वाहन व इतर शासकीय वाहनांची नंबरप्लेट सर्वांनाच मूकपाठ झालेली आहेत.वाहनांचा रंग कोणता व कोणता अधिकारी कुठून निघाला वा कोणता कर्मचारी कुठे गेलाय; हे तस्करांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.

त्यासाठी ‘आम्ही कुठून निघतो व कुठे जाणार’ हे चोरट्यांना कळू नये; याकरिता रात्रीच्या सुमारास अवैध गौण खनिजांची तस्करी पकडण्यासाठी चक्क ऑटोरिक्षाच भाड्याने घेऊन तस्करांचा पाठलाग करण्यात आला.मात्र सदर प्रकार तस्करांना लक्षात येताच; चोरट्यांनी जो पळ काढला तो वाहन थांबता-थांबेना..! ‘ऑटोरिक्षाची धाव अन् देवामले पाव’ असे असल्याने ‘उलटी गंगा मार्कंड्या’ ची झाली असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!