Thursday, May 28, 2026
Homeनागपूरअनियंत्रित कार थेट नदीत कोसळली; तरुणाचा मृत्यू..!

अनियंत्रित कार थेट नदीत कोसळली; तरुणाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील मरु नदीच्या पुलावरून वळण घेतांना अनियंत्रित झालेली  टाटा हॉरियर कार थेट ४० फूट उंचीवरून नदीत कोसळल्याने कार चालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार २४ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. सागर वाघमारे वय ३५ वर्षे रा.उमरेड,जि.नागपूर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून अवघ्या चार महिन्यांपूर्वीच त्याने नवी कोरी कार खरेदी केली होती.
सागर वाघमारे हा आज सकाळच्या सुमारास काळ्या रंगाची टाटा हॉरियर कार घेऊन एकटाच नीरजकडून उमरेडच्या दिशेने जात होता.सकाळी ८ वाजताच्या दरम्यान मरु नदीच्या पुलावरून वळण मार्ग ओलांडत असतांनाच सागरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तो कारसह थेट ४० फूट उंच पुलावरून नदीत कोसळला. नदीपात्रात पाणी असल्याने कार पाण्यात बुडाली.यामुळे सागरला बाहेर निघता न आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार नदीपात्रातून बाहेर काढून सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.सागर वाघमारे हा हॉटेल व्यवसायिक होता. वडिलांचे निधन झाल्याने दोघे भाऊ हॉटेल व्यवसाय सांभाळत होते.त्यातच सागर याने चार महिन्यांपूर्वीच नवीन कार घेतली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!