गोंदिया :-जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव शहरातील प्रभाग क्र.५ येथील अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल,१७ सप्टेंबरच्या दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. रेयांस संदिप शहारे,रा.अर्जुनी-मोरगाव असे चिमुकल्याचे नाव आहे.
अडीच वर्षीय चिमुकला अंगणातील विहीरीत पडला; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
रेयांस हा घरासमोर खेळत असताना अचानक आईची व घरच्या मंडळींची नजर चुकवून अंगणातील विहीरीकडे गेला.यावेळी खेळताना त्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यु झाला.रेयांस दिसत नाही म्हणून घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली.पण रेयांस कुठेच सापडला नाही. प्रभागातील काही लोकांनी विहीरीत डोकावून पाहिले असता तो नजरेस पडला.त्याला बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. रेयांसचे वडील शहारे हे मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून रेयांस हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.या दुर्दैवी घटनेमुळे अर्जुनी मोरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

