- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे.काल संध्याकाळी उशिरा ही घटना घडली.एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या बाहेर असलेली पाटी देखील फोडून फेकली.या प्रकरणाची आता पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या पावसामुळे सर्व कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची घाई होती.त्याच वेळेस एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरील पार्टी काढून फोडून फेकून दिली.त्यानंतर ही महिला फडणवीस यांच्या कार्यालयात देखील घुसली.या महिलेने कार्यालयातील झाडांच्या कुंड्या देखील फोडल्या.यावेळी महिलेने जोरात आरडाओरोड केली.मात्र,या मागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.त्यानंतर ही महिला तेथून पसार झाली.
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला ते म्हणाले की, ‘मंत्रालयातील 6 व्या माळ्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. याच कार्यालयाबाहेर एक महिला गृहमंत्र्यांच्या नावाची पाटी तोडून आपला राग व्यक्त करताना व्हिडीओत दिसत आहे. एकीकडे सरकारचे लाडक्या बहिणीचे इव्हेंट सुरू आहेत तर दुसरीकडे एक महिला मंत्रालयात येऊन संतापाने नावाची पाटी फोडत आहे.. राज्यातील ही दोन चित्र खूप काही सांगून जात आहेत.’
- Advertisement -

