उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- दीड वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत गोंदिया तालुक्यातील बिरसी (कामठा) येथील संतोष प्रकाश सोनवाणे हे सरपंचपदी विराजमान झाले होते.परंतु त्यांनी खोटे दस्तावेज सादर करून जात प्रमाणपत्र बनविले असे चौकशीअंती निष्पन्न झाल्याने जिल्हाधिऱ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करीत त्यांना सरपंच पदावरून पायउतार करीत घरी बसवले आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायत बिरसी (का.) ची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली.त्यात सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी (ST) आरक्षित असल्याने संतोष प्रकाश सोनवाणे हे सरपंचपदी विराजमान झाले.परंतु सरपंच संतोष सोनवाणे यांनी खोटे दस्तावेज सादर करून अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र बनविले,अशी तक्रार गावातील सुरेश पंधरे व इतर व्यक्तींनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे केली होती.याप्रकरणी जिल्हाधिकारी तसेच अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती यांच्या चौकशीत सरपंच संतोष सोनवाणे हे दोषी आढळून आले.त्यामुळे सरपंच संतोष सोनवाणे यांना २६ जून पासून सरपंच पदावरून पायउतार करण्यात आले.
सुरेश मूलचंद पंधरे,तक्रारदार👇
विद्यमान सरपंच यांनी खोटे दस्तावेज सादर करून खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय केला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आदेशाने आम्हा आदिवासी समाजाला न्याय मिळालेला आहे.

