Thursday, May 14, 2026
Homeमुंबईअखेर ५४७ किमीच्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मंजुरी.. - नागपूर-गोंदिया,भंडारा-गडचिरोली,नागपूर-चंद्रपूर व...

अखेर ५४७ किमीच्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मंजुरी.. – नागपूर-गोंदिया,भंडारा-गडचिरोली,नागपूर-चंद्रपूर व नवेगाव मोरे-कोनसरी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई/गडचिरोली :-महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील ५४७ किलोमिटरच्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.यात गडचिरोली जिल्ह्यातील भंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्ग तसेच नवेगाव मोरे-कोनसरी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता या गडचिरोलीच्या औद्योगिक आणि खनिज विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज,गुरुवार १४ मे रोजी मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले,उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,राज्यमंत्री इंद्रनील नाईक,राज्यमंत्री आशिष जयस्वाल,मुख्य सचिव राजेश अग्रवाल,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सचिव(बांधकामे) आबासाहेब नागरगोजे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.अप्पर मुख्य सचिव म्हैसकर यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्रकल्पांची माहिती दिली.
महाराष्ट्राचे पूर्व व पश्चिम क्षेत्र जोडणारे आणि विदर्भातील विकासात महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या या प्रकल्पांची पुढील कार्यवाही जलदगतीने करून प्रकल्प वेळेत होईल यावर भर द्यावा.नवेगाव मोर ते सुरजागड हा मार्ग खनिज वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा,अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.तसेच पश्चिम महाराष्ट्र ते कोकणाला जोडणाऱ्या टनेल रस्त्यासंदर्भात अभ्यास करून सादरीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
नागपूर-गोंदिया प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग,भंडारा- गडचिरोली द्रुतगती मार्ग,नागपूर-चंद्रपूर द्रुतगती मार्ग आणि नवेगाव मोरे-कोनसारी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता या प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना यावेळी मान्यता देण्यात आली.या चारही प्रकल्पांची स्थापत्य किंमत ३२ हजार ४७८ कोटी व एकूण बांधकाम किंमत ५१९०६.३५ कोटी रुपये एवढी आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गांचे काम केले जाणार आहे.हे सर्व प्रकल्प सप्टेंबर २०२८ ते डिसेंबर २०२८ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे,असे म्हैसकर यांनी यावेळी सांगितले.
  • प्रकल्पांची वैशिष्ट्ये👇

१.नागपूर-गोंदिया द्रुतगती मार्ग-

  •  एकूण लांबी- १६२.३७७ कि.मी.
  • प्रारंभ व शेवटचा बिंदू- गवसी मानपूर,नागपूर ते सावरी,गोंदिया
  • लेनची संख्या- ३+३
  • इंटर चेंज- ९
  • आवश्यक भूसंपादन- १६३४.२७ हे.
हा महामार्ग नागपूर,भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांना जोडला जाणार आहे.
२.भंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्ग-
  • एकूण लांबी- ९४.२४१ कि.मी.
  • प्रारंभ व शेवटचा बिंदू-बोरगाव,जि.भंडारा ते ऋणमोचन,जि.चंद्रपूर
  •  लेनची संख्या- ३+३
  • इंटर चेंज- ६
  • आवश्यक भूसंपादन- ११८५.७३ हे.
हा महामार्ग भंडारा,गोंदिया,गडचिरोली या तीन जिल्ह्यांना जोडला जाणार
३.नागपूर-चंद्रपूर द्रुतगती मार्ग-
  • एकूण लांबी- २०४.७९९ कि.मी.
  • प्रारंभ व शेवटचा बिंदू- सेलडोह,जि.वर्धा ते नवेगाव मोरे(घाटकुळ),जि.चंद्रपूर
  • लेनची संख्या- २+२
  • इंटर चेंज- ७
  • आवश्यक भूसंपादन- २१५९.०८७ हे.
हा महामार्ग नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील ९ तालुक्यांना जोडला जाणार आहे.
४.नवेगाव मोरे-कोनसरी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता-
  • एकूण लांबी- ८५.७६५ कि.मी
  • प्रारंभ व शेवटचा बिंदू-नवेगाव मोरे(घाटकुळ), जि. चंद्रपूर ते मंगेर,जि.गडचिरोली
  • लेनची संख्या- २+२
  • आवश्यक भूसंपादन- २८९.०२ हे.
हा महामार्ग चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ४ तालुक्यांना जोडला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सात आदिवासी,डोंगराळ व मागास जिल्ह्यांत १७ नवीन व्यावसायिक महाविद्यालयांना मान्यता.. -२०३०-३१ पर्यंत नवीन फार्मसी अभ्यासक्रमांना स्थगिती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-कौशल्याधारित शिक्षणाला गती देण्यासाठी नवीन कौशल्य केंद्रांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यात शैक्षणिक वर्ष २०३०-३१ पर्यंत औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या नवीन पदवी...

नागपूरहून काही रेल्वे गाड्या रद्द; तर काही गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मध्य रेल्वेच्या पुणे विभागात दौंड-मनमाड मार्गावरील अकोलनेर-अहिल्यानगर-निंबळक स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत.यासाठी विशेष ट्रॅफिक आणि...

“माझ्या लेकीला वाचवा हो…!” मृत्यूशी झुंज देणाऱ्या १२ वर्षीय सनाया मेश्रामसाठी एका गरीब वडिलांची समाजाला आर्त हाक…

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील गडीसुर्ला गावात आज एक माणुसकीला चटका लावणारी वेदनादायक घटना उघडकीस आली आहे.ज्या वयात शाळेच्या दप्तरासोबत मोठी स्वप्ने रंगवायची...

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यास मुदतवाढ; शेवटची संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच एचएसआरपी(HSRP)नंबर प्लेट बसवणे आता अनिवार्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!