Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; पण किती?

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; पण किती?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून,पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.विशेष म्हणजे,काही पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी दीड हजार रुपये जमा झाले,तर परत आज गुरुवारी दीड हजार रुपये असे दोन्ही महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.फेब्रुवारी महिन्यानंतर मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे रखडला होता.मे महिना उजाडल्यानंतरही खात्यात पैसे जमा न झाल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील लाभार्थी महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.अश्यातच अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा संदेश धडकल्याने पात्र लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले. मात्र,नियमांचे उल्लंघन तसेच चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे शोधून अश्यांना अपात्र करण्यात आल्याने लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाली आहे.केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा,याची खबरदारी शासन स्तरावरून घेण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!