- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या मौशी(पलसगड)येथील पोलिस पाटील टीकाराम सहारे व आनंदीबाई बोदेले या दोन शेतकऱ्यांच्या धानाचे पुंजणे मागील महिन्याच्या दिनांक-१३ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाकडून जाळण्यात आले होते.त्यामुळे हताश व चिंताग्रस्त दोन्ही शेतकऱ्यांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी त्यावेळी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू ठेवला होता.अशातच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तक्रार देणाऱ्या शेतकरी आनंदीबाई बोदेले यांचा नातेवाईक कुरखेडा तालुक्याच्या वाकडी गावातील राजकुमार मधुकर राऊत वय २६ वर्षे याने दोन्ही शेतकऱ्यांचे ४ एकर शेतीतील ३ धानाचे पुंजणे बोदेले यांच्याशी पूर्ववैमनस्यातून १३ नोव्हेंबर रात्री जाळले असल्याची कबुली दिली.पोलिसांनी राजकुमार राऊत यास अटक करून कुरखेडा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisement -

