Tuesday, July 28, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरअखेर पंचायत समितीचे BDO निलंबित- सरपंचाने लाच मागणाऱ्यांच्या विरोधात पंचायत समिती कार्यालय परिसरात...

अखेर पंचायत समितीचे BDO निलंबित- सरपंचाने लाच मागणाऱ्यांच्या विरोधात पंचायत समिती कार्यालय परिसरात नोटांची केली होती उधळण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगरच्या फुलब्री तालुक्यातील सरपंच साबळे यांच्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंवर कारवाई करण्यात आली आहे.राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे.

दरम्यान या प्रकरणी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे म्हणाले की,हा निर्णय स्वागातार्ह आहे.मंत्री महाजन यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.मी उधळलेले पैसै मला वापस करावे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.कारण हा सर्व पैसा माझ्या शेतकरी बांधवांच्या घामाचा पैसा आहे.

गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे म्हणाले की, माझ्या गावात विहिरीचे २० प्रस्ताव दाखल आहेत. या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के रक्कम मागत आहेत. बुधवारी कनिष्ठ अभियंता गायकवाड,ग्रामरोजगार सेविकासोबत गटविकास अधिकारी यांची भेट घेतली.तेव्हा मी आणलेले १ लाख रुपये न घेता मला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले.त्यानंतर माझ्याकडे कनिष्ठ अभियंता आणि रोजगार सेवकाला पाठवून १२ टक्के प्रमाणे रक्कमेची मागणी करण्यात आली.यामुळे २ लाख रुपये घेऊन मी कार्यालयात आलो,पण या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले नाहीत,अशी माहिती मंगेश साबळे यांनी दिव्य मराठी ला दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!