Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरअखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच आज,मंगळवार ९ जून रोजी पाच तरुणांपैकी अद्याप तीन तरुणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे,नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांचे वर्धा नदीच्या काठावर कपडे,चपला व मोबाईल आढळून आले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराच्या इंदिरानगर परिसरातील रहिवासी असलेले तन्मय पाथाडे वय १७ वर्षे,समय सोनटक्के वय १७ वर्षे,शिव केळझरकर वय १८ वर्षे,सनी आसामपिल्ली वय १८ वर्षे आणि रोहित बोबडे वय १९ वर्षे हे पाच मित्र काल सोमवारी दुपारच्या सुमारास म्हातारदेवीजवळील वर्धा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते.बराच वेळ होऊनही मुले घरी परतली नसल्याने त्यांच्या पालकांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध करायला सुरुवात केली.या दरम्यान,काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तरुणांना नदीच्या दिशेने जातांना पाहिले होते.त्यानुसार,शोधमोहीम राबविण्यात आली असता वर्धा नदीच्या काठावर संबंधित तरुणांचे कपडे,चपला व मोबाईल आढळून आले होते. कपडे व इतर साहित्य नदीकाठावर सापडल्याने ते नदीत उतरले असावेत आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असावेत,अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यानुसार,स्थानिक प्रशासन,पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू होती.अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत आज मंगळवारी सकाळच्या सुमारास शोधमोहीम सुरू केली असता दुपारपर्यंत तीन तरुणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!