- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली होती.वरोरा शहरातील बसस्थानक परिसरातील मनोज चिवडा सेंटरमधून काही नागरिकांनी कच्चा चिवडा घेतला असता चिवडा खात असतांना त्यामधे मृत पाल (विचगुर)आढळली होती.चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना मळमळ,उलटी व इतर त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारानंतर सर्व सातही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.मात्र,अन्न व औषध प्रशासन विभागाने याची तात्काळ दखल घेत दुकानदारावर कारवाई करत दुकान सील केले आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रवीण उमक यांनी म्हटले की,संबंधित दुकानाचा खाद्य परवाना निलंबित करण्यात आला असून दुकान सील करण्यात आले आहे.आरोग्य व पोलिस प्रशासनाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -

