Sunday, July 5, 2026
Homeचंद्रपूरअखेर तरुणाचा बळी घेणारा वाघ जेरबंद..!

अखेर तरुणाचा बळी घेणारा वाघ जेरबंद..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या चोरगाव परिसरात वाघाने हल्ला चढवून ३१ वर्षीय तरुण शेतकऱ्यास ठार केल्याची घटना रविवार २८ जून २०२६ रोजी उघडकीस आली होती.संजय माधवराव सिडाम रा.केळझर,ता.राजुरा,जि.चंद्रपूर असे वाघाने ठार केलेल्या तरुणाचे नाव असून तो पत्नी,सासू आणि सासऱ्यासह चोरगाव परिसरातील शेतावर गेला होता. दरम्यान,वन्यप्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेताभोवती सौरऊर्जेवर चालणारे बॅटरीचे कुंपण लावण्याचे काम सुरू होते.कुंपणासाठी शेताच्या बाजूच्या झाडांच्या फांद्या तोडत असतांना जंगल परिसरातून मार्गक्रमण करत आलेल्या वाघाने अचानकपणे संजयवर पाठीमागून झडप घातली आणि ठार केले होते.तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार,वनविभागाच्या पाठपुराव्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून वाघाला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.आदेश मिळताच वन विभागाने तातडीने शोधमोहीम सुरू केली.वाघाला पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी चोरगाव परिसरात पिंजरे तसेच भक्ष्याची तजवीज करून प्रसिद्ध शूटर अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधत डार्ट गनद्वारे वाघाला बेशुद्ध करण्यात आले.त्यानंतर,वन कर्मचाऱ्यांनी वाघाला पिंजऱ्यात जेरबंद केले.सदरचा वाघ हा दोन वर्षे वयाचा होता. घटनास्थळावरच त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली.डॉक्टरांच्या तपासणीत वाघाची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट झाले.त्यानुसार,पुढील प्रक्रिया आणि देखरेखीसाठी वाघाला तातडीने चंद्रपूर येथील ताडोबा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर(टीटीसी)येथे हलविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीत बाल हृदय तपासणी व मोफत शस्त्रक्रिया उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – आज ३०० हून अधिक बालकांची तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन होणे ही अत्यंत समाधानाची बाब असून लोकप्रतिनिधी, सामाजिक...

मुसळधार पावसाचा फटका; झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत झाड कोसळण्याच्या घटना सुरूच असल्याने यंदाच्या पावसाळ्यात...

थरकाप उडवणारी घटना..! तब्बल ४२ नाग सापांची टीम बाहेर पडली असती तर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र डास,किडे व सरपटणाऱ्या प्राण्यांची जिकडे-तिकडे भटकंती सुरू होत असते.अश्यातच एखादा अति विषारी साप नजरेस पडला,तर त्याला पाहून अंगावर...

१६ वर्षीय तरुणीवर बिबट्याचा हल्ला; तरुणी गंभीर जखमी

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुराख्यांसह शेळ्या राखत असतांनाच अचानकपणे बिबट्याने हल्ला चढवून एका १६ वर्षीय तरुणीला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी लाखांदूर तालुक्याच्या मांदेड-गवराळा मार्गावरील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!