Tuesday, September 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर इस्लामपूर शहराच्या नामांतर प्रस्तावाला केंद्राची मंजुरी.. - आतापर्यंत तीन जिल्ह्यांच्या नावात...

अखेर इस्लामपूर शहराच्या नामांतर प्रस्तावाला केंद्राची मंजुरी.. – आतापर्यंत तीन जिल्ह्यांच्या नावात बदल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मतदारसंघ असलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराच्या नामांतर प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली असून आता इस्लामपूर शहर ईश्वरपूर नावाने ओळखले जाणार आहे.इस्लामपूर शहराच्या नामांतराला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती.राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर आता केंद्र सरकारने देखील इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.राज्य सरकारकडून नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता.या प्रस्तावावर केंद्र सरकारने देखील मंजुरी दिली असल्यामुळे अखेर नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.महायुती सरकारने यापूर्वी तीन जिल्ह्यांच्या नावात बदल केले आहेत.त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर शहराचे नामांतर करण्याची मागणी केली होती.यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहील्यानगर,औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर,तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!