- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकट्या प्रतिस्पर्धीने सर्वांची डोकेदुखी वाढवली असल्याने ‘त्यांना’ तिकीट नको मिळो रे देवा..! यासाठी विरोधकांचा आटापिटा सुरू झाला आहे. जुन्याच उमेदवारांना संधी मिळावी व आपले काम फत्ते व्हावे; यासाठी विरोधकांकडून कसोशीने प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली असल्याचे वृत्त काल,गुरुवारी १७ ऑक्टोंबरला ‘उद्रेक न्युज’ ने प्रसारित केले होते.त्यानुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विरोधकांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा क्षेत्रात यावेळेस चित्र बदलण्याचे संकेत दिसू लागले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीत मोठी रंगतदार व चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे.कोण, कोणता तबला वाजवेल व इतर उमेदवार कोणते वाद्य वाजविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यात निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी म्हणजेच आदर्श आचारसंहिता लागण्यापूर्वी आरमोरी विधानसभा क्षेत्रात ‘एक्झिट पोल अन् ठरले फोल’ अशी गंमतशीर कहाणी सर्वांच्या नजरेसमोर दिसून आली.अशातच आता आरमोरी विधानसभेची तिकीट कोणाला मिळेल गा भाऊ? असा सूर सर्वत्र उमटत असतांना आरमोरी विधानसभा क्षेत्रात जनतेचा कौल म्हणतोय ‘त्यांनाच’ तिकीट मिळो रे देवा.! याविषयीच्या चर्चांना आता ऊत आला आहे.
- Advertisement -

