Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततरुणीने सांगितले निरक्षर आहे; पण सही करण्याची वेळ येताच फुटले बिंग...! -...

तरुणीने सांगितले निरक्षर आहे; पण सही करण्याची वेळ येताच फुटले बिंग…! – बलात्काराच्या खोट्या आरोपात अडकवीलेल्या तरुणीला ४ वर्षाची शिक्षा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून ज्यामुळे कोर्टानेही आश्चर्य व्यक केले आहे.एका तरुणाला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात चार वर्षांचा कारावास भोगावा लागला.त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागली.
झी २४ तास ने दिलेल्या वृत्तानुसार,सत्यता समोर आल्यानंतर कोर्टाने तरुणाची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय घेतला.इतकेच नाही तर कोर्टाने तरुणीला तितक्याच दिवसांची शिक्षा सुनावली आहे. जितके दिवस तरुण न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात होता; याशिवाय तिला आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे.कोर्टाने सांगितले की,जर तरुण बाहेर असता तर मजुरी करुन आतापर्यंत ५ लाख ८८ हजारांची कमाई केली असती.ही रक्कम तरुणीकडून वसूल केली जावी,असे न झाल्यास तिला सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल असे कोर्टाने सांगितले आहे.
पीडित तरुण अजय उर्फ राघव ने सांगितले की,२०१९ मध्ये तरुणीची मोठी बहीण माझ्याकडे प्रोग्रामसाठी आली होती.त्यांनी आम्हाला प्रोग्राम शिकायचा आहे असे सांगितले.यासाठी आम्ही त्यांच्या घऱी जायचो. जिथे कार्यक्रम असायचा तिथे नितूचा पतीही सोबत असे.त्यांच्या कुटुंबीयांनाही आम्ही कुठे आहोत हे माहिती असायचे.पुढे तो म्हणाला, “माझ्यावर अपहरण आणि बलात्काराचा खोटा आरोप करण्यात आला.माझे करिअर बर्बाद करण्यात आले.आता मी कुठेही गेलो तरी लोक माझ्याकडे संशयाने पाहतात. पण कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे.जितके दिवस मी जेलमध्ये होतो; आता तितकेच दिवस तिला जेलमध्ये राहावे लागणार आहे.तिला मला ५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत.कोर्टाने मला दोषमुक्त केले असले तरी माझ्यावर लागलेले डाग पुसले जाणार नाहीत”. आपले मत मांडताना पीडित राघवने सांगितले की,या प्रकरणी न्यायालयात मुलीने आपली साक्ष फिरवली.यापूर्वी तिने सांगितले होते की ती निरक्षर आहे आणि तिला लिहिणे वाचणे माहित नाही. पण सही करण्याची पाळी येताच मुलीने इंग्रजीत सही केली.त्यानंतर न्यायाधीशांना समजले की मुलगी खोटे बोलत आहे आणि मुद्दाम तरुणाला अडकवत आहे. त्यानंतर न्यायालयाने तरुणाची निर्दोष मुक्तता केली आणि तरुणीला शिक्षा सुनावली.या संपूर्ण प्रकरणात तरुणीवर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेत न्यायालयाने कठोर भूमिका घेत म्हटले की, “अशा महिलांच्या कृत्यामुळे खऱ्या पीडितांनाच नुकसान सहन करावे लागते.ही समाजासाठी अत्यंत गंभीर बाब आहे.आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोलीस आणि न्यायालय या माध्यमांचा वापर करणे आक्षेपार्ह आहे.महिलांना पुरुषांच्या हितसंबंधांवर आक्रमण करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही”. असे कोर्टाने म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!