- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही काळ विश्रांती घेतलेला अवकाळी पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.राज्यातील मध्य महाराष्ट्र,कोकण तसेच विदर्भात २० ऑक्टोंबर पर्यंत वादळी वारे,विजांचा कडकडाट, मेघगर्जना यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसणार आहे.दरम्यान,हवामान विभागाने राज्यातील बहुतांश भागात यलो अलर्ट जारी केला आहे.दक्षिण भारतात मान्सून सक्रिय झाल्यामुळे राज्यात अवकाळी बरसत आहे; असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार पालघर,ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक,नगर,पुणे,कोल्हापूर,सातारा,सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर,परभणी,बीड,हिंगोली,नांदेड, चंद्रपूर, वर्धा, वाशिम,यवतमाळ,गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.नैऋत्य मान्सून देशाच्या सर्वच भागांतून परतला असून,आता दक्षिण भारतात मान्सून सक्रिय झाला आहे.त्यामुळे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश,तेलंगणा,तामिळनाडू, केरळ या भागांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात वादळी वारे ताशी ३० ते ४९ किलोमीटर वेगाने वाहणार आहेत. विशेषतः,कोकण,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात याचा परिणाम जास्त जाणवणार आहे.
- Advertisement -

