Thursday, July 30, 2026
Homeदेसाईगंज'त्यांना' तिकीट नको मिळो रे देवा..! यासाठी विरोधकांचा आटापिटा... - आरमोरी विधानसभा...

‘त्यांना’ तिकीट नको मिळो रे देवा..! यासाठी विरोधकांचा आटापिटा… – आरमोरी विधानसभा क्षेत्रात तिकीट कोणाला?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल नुकतेच जाहीर करण्यात आले असून येत्या पुढील महिन्याच्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत.दिनांक- १५ ऑक्टोंबरला मंगळवारी आचारसंहिता घोषित होताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून गल्ली-बोळात तसेच चावडीवर बसणाऱ्या नागरिकांच्या निवडणुकीसंबंधात विविध चर्चांना उधाण येऊ लागले आहे.अशातच चर्चेअंतर्गतच आरमोरी विधानसभेची तिकीट कोणाला मिळेल गा भाऊ? असा सूर उमटतांना दिसून येत आहे.
आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी विविध पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी मीच विधानसभेचा उमेदवार म्हणून प्रचाराला सुरुवात केली होती.विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी विविध सण उत्सवांच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावून आपणच उमेदवार असल्याचे भासविले होते.दरम्यान,मंगळवारपासून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली.त्यानुसार मंगळवारी रात्रीपर्यंत आरमोरी विधानसभा क्षेत्रात असलेल्या पाचही तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांचे होर्डिंग्ज काढण्यात आले.तथापि,सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असून बहुतांश नागरिक शेतशिवारात तर काही नागरिक गावातील पान टपरी,चौका-चौकात चावडीवर बसल्याचे दिसून येतात.आता निवडणुकीची उमेदवारी कोणत्या पक्षाकडून कोणाला मिळते व कोण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहणार,याविषयीच्या चर्चांना ऊत आला आहे.अशातच आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकट्या प्रतिस्पर्धीने सर्वांची डोकेदुखी वाढवली  असल्याने ‘त्यांना’ तिकीट नको मिळो रे देवा..! यासाठी विरोधकांचा आटापिटा सुरू झाला आहे. जुन्याच उमेदवारांना संधी मिळावी व आपले काम फत्ते व्हावे; यासाठी विरोधकांकडून कसोशीने प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!