Tuesday, April 28, 2026
Homeमुंबईउमेद' च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरुपी करण्याचे आश्वासन...

उमेद’ च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरुपी करण्याचे आश्वासन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :- उमेदचे कंत्राटी कर्मचारी गेल्या बऱ्याच वर्षांपासून राज्य,जिल्हा,तालुका तसेच ग्राम पातळीवर मानधनावर काम करीत आहेत.उमेद म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान ही केंद्र शासनाची योजना आहे.योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला सक्षमीकरण व विविध कार्ये कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर करावे लागत असल्याने राज्यातील ८४ लाख ग्रामीण कुटूंबाच्या उज्वल भवितव्यासाठी ७ ऑक्टोंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानात संघटनेचे आंदोलन सुरु आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी,कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरुपी समाविष्ट करु; असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी मुंबईत दिले.
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे,आमदार
माणिकराव कोकाटे,सुहास कांदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.काल,सोमवारी आंदोलनाचा ८ वा दिवस होता.संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल शिर्के व मार्गदर्शक उपोषणकर्ते प्रभाकर गावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे.राज्यभरातून बहुसंख्य महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!