- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्र उत्सव आज अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे.भाविक-भक्तांनी नऊ दिवस उपवास ठेवून नऊ दिवस दुर्गा मातेची आराधना करीत माते चरणी नतमस्तक होऊन विविध मंडळांच्या वतीने मनोरंजनात्मक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पाडण्यात आले.स्त्रीरूपाचा सन्मान पूजा आणि उत्सव म्हणजे नवरात्र.नऊ दिवस मातेचा जागर करताना गेल्या काही दिवसात गरबा दांडिया खेळण्याचा कल वाढलेला दिसून येतो.पारंपारिक लोकनृत्याचा जागर असणाऱ्या गरबाला काही वर्षात महिलांनी मोठी पसंती दिल्याची दिसते. सायंकाळपासून रात्रीपर्यंत गरबा-दांडिया खेळला जातो.वर्तुळावर फेर धरून विविध गाण्यावर संगीताच्या तालावर महिला दांडिया खेळाचा आनंद घेतात.गरबा नृत्य आवाजाने देवी जागृत होते; असे मानले जाते.धार्मिक प्रथेचा महत्त्वाचा भाग असलेला गरबा दांडियाला आता शहरासह ग्रामीण भागातही मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. नवरात्र उत्सव आणि गरबा हे समीकरणच बनले आहे.त्यामुळे नवरात्र उत्सव गरबा-दांडिया खेळण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा खप वाढलेला आहे.याशिवाय ज्वेलरी कपड्यांनाही विशेष महत्त्व आलेले आहे.नऊ दिवसात वैविध्य पूर्ण शारदीय नवरात्र उत्सवात रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.नवरात्रीत प्रमुख आकर्षण असणाऱ्या गरबा-दांडियाचे आयोजन देसाईगंज तालुक्यात ठीकठिकाणी करण्यात आले.देवी दुर्गा मातेला समर्पित केलेल्या उत्सवात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना मिळाली असून देसाईगंज तालुक्यातील चोप येथील सार्वजनिक बाल दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गुरुवारी रात्रीच्या सुमारास गरबा-दांडियाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये परिसरातील व लगतच्या बाहेर जिल्ह्यातील युवक-युवती,महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या संघाला आकर्षक पारितोषिक देण्यात आले.प्रसंगी चोप येथील गरबा उत्सव स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आदर्श गरबा ग्रुप कुरुड(ता.देसाईगंज),तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक खेमेश्वरी गरबा ग्रुप महागाव (ता.अर्जुनी मोरगाव जि.गोंदिया)तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जेएमडी ग्रुप आंधळी नवरगाव (ता.कुरखेडा) यांनी पटकावलेला आहे.
सार्वजनिक बाल उत्सव दुर्गा मंडळ चोपचे अध्यक्ष शुभम नागपूरकर,विनोद डोंगरवार,शिवम नागपूरकर, विश्व बावणे,प्रमोद बावणे,तीलक गायकवाड,सुरज बावणे,निलेश राऊत,विशाल डोंगरवार सह मंडळातील कार्यकर्त्यांनी रक्तदानासह नवरात्रोत्सवात विविध
कार्यक्रम तसेच उपक्रम राबविले आहेत.
- Advertisement -

