- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो किंवा बँकेतून कर्ज घ्यायचे असो सर्वसाधारणपणे नागरिकांना किमान १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरून दस्तावेज तयार करता येत होता. १००,२०० आणि ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर नागरिकांचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता.मात्र, यापुढे १०० आणि २०० रुपयांचे स्टॅम्प पेपर इतिहासजमा होणार आहेत.कारण,आता किमान ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरच खरेदी,नोटरी,हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार आहे.राज्य सरकारने मुद्रांक शुल्कवाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ ५०० रुपयांचे स्टॅम्प जारी केले जातील.त्यामुळे,सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात एक नव्हे हजारो योजना आल्या आहेत.परंतु, एका हाताने हजार द्यायचे अन् दुसऱ्या हाताने १० हजार काढून घ्यायचे,असा काहीसा प्रकार सुरू आहे. लाडक्या बहिणींना दीड हजार दिले.परंतु त्याच बहिणीच्या खऱ्या भावाकडून काही हजार काढून घेतले जात आहे.आतापर्यंत नोटरीचा साधा स्टॅम्प १०० रुपयांना मिळत होता.आता तो ५०० रुपयांना मिळणार आहे.बहिणीला दिलेले भावाकडून वसूल करून घेत असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून व्यक्त होत आहे.तहसील किंवा महसूल कार्यालयात अवघ्या शंभर,दोनशे रुपयांत स्टैंप घेतले जात होते. वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठेखतानंतरचे खरेदीखत
हक्क सोडपत्रासाठी आता ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे.राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांची खैरात केल्याने अन्य योजनांसाठी निधी कमी पडू लागल्याचे चिंता आहे.त्यामुळे महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याची चर्चा महसूल खात्यांतर्गत बोलली जात आहे.ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे.त्यामुळे,आता महसूल वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग केला जात आहेत.विधानसभेची निवडणूक तोंडावर येताच राज्य सरकार विविध योजना राबवित आहे.राबविलेल्या योजनांचे स्वागतच आहे.मात्र,हा प्रकार निव्वळ मतदारांना आकर्षित करण्याचा असल्याचे स्पष्ट होत आहे.बरे या योजनांमधून सर्वांचे भले होत असेल तर लोकांना समाधान वाटले असते.सरकारने विकासकामाला खुटी मारत लाडक्या बहिणी व इतर योजनांसाठी दिलेल्या पैशांची वसुली सुरू केली आहे. एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने वसूल करण्याचा धंदा राज्य सरकार करीत आहे.लाडक्या बहिणीची योजना सुरू करून महिलांना खुश करण्यात आले. परंतु,शेतमालाला भाव नाही,बेरोजगारी वाढली आहे. नोकरी मिळालीच तर ती कंत्राटी असते.दर्जेदार शिक्षण दुर्मिळ झाले आहे.अशा अनेक गोष्टींसाठी नागरिक झगडत आहेत.पण,राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करून मतदारांना तात्पुरते खुश करण्याचा प्रयत्न करीत आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना खुश केले.पण,लाडक्या भावाचा खिसा कापला जात आहे.यापूर्वी नोटरी अथवा विविध कामांसाठी १०० रुपयांचा स्टॅम्प मिळत होता.तो आता बंद करण्यात येणार असून,लहान मोठे काम असले तरी ५०० रुपयांचा स्टॅम्प भावांना घ्यावा लागणार आहे.यातून सरकार बहिणीला दिलेले भावाकडून कैकपटीने वसूल करणार आहे.याचा फटका सध्याच्या सत्ताधाऱ्यांना बसणार आहे.
विविध कामांसाठी सर्वसामान्य लोक रोज लाखो स्टॅम्पची खरेदी करतात.यापूर्वी नोटरी अथवा इतर लहान मोठ्या कामासाठी अवघ्या १०० रुपयांचा स्टॅम्प मिळत होता.लाडकी बहीण व इतर अनेक योजना राबविल्यानंतर या स्टॅम्पची किंमत ५०० टक्के वाढ करून ५०० एवढी करण्यात आली आहे.हा प्रकार लाडक्या बहिणींना दिलेले भावाकडून वसूल करण्याच्या बोलक्या प्रतिक्रिया लोकं व्यक्त करीत आहेत.समाजमाध्यमात याची जोरदार चर्चा असून, लाडक्या बहिणीतून कमावले अन् भाऊ गमावले, अशी गत विद्यमान सरकारची होणार असल्याची चर्चा आहे.
- Advertisement -

