Monday, August 31, 2026
Homeमुंबईएसटी महामंडळाने सुंदरी पदावरच मारली कट.. आता 'शिवनेरी सुंदरी' नव्हे; तर 'या'...

एसटी महामंडळाने सुंदरी पदावरच मारली कट.. आता ‘शिवनेरी सुंदरी’ नव्हे; तर ‘या’ नावाने शिवनेरी बसमध्ये होणार महिला,पुरुषांची नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-विमानाप्रमाणे ई-शिवनेरीमध्ये ‘सुंदरी’ नेमणार म्हणून चर्चा उठली आणि आता निर्णयच फिरवला गेल्याचे चित्र पुढे आले आहे.सुंदरी या पदावरच कट मारत ई-शिवनेरीमध्ये “मदतनीस’ नियुक्त करण्यात येणार असून १५० महिला-पुरुष मदतनीसांची नियुक्ती एसटी महामंडळ करणार आहे.
सध्या ८३ ई-शिवनेरीच्या दररोज तीन फेऱ्या होतात. दोन फेऱ्यासाठी एक मदतनीस या प्रमाणे सुमारे १५० महिला आणि पुरुष मदतनीस नियुक्त करणे अपेक्षित आहे.महिला मदतनीस दिवसा तर पुरुष मदतनीस रात्रीच्या प्रवासादरम्यान उपलब्ध असतील.या मदतनीसांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असेल.त्यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहे.मदतनीस या आदरातिथ्य व्यवस्थापन व्यवसायाशी संबंधित कोर्स केलेला असावा,ही पहिली अट आहे.मदतनीसला योग्य युनिफॉर्म दिला जाणार आहे.खानपान सुविधा काय द्यायची यासंदर्भात संबंधित संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात येणार आहे. यासाठी आदरातिथ्य व्यवस्थापन संदर्भात काम करणाऱ्या संस्थांच्याकडून खुल्या निविदा मागवण्यात येणार आहेत.
२००२ पासून मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीची प्रतिष्ठित सेवा सुरू आहे.सध्या ई-शिवनेरी या नावाने एसी पर्यावरण पूरक बस या मार्गावर धावत आहेत.दररोज आठ ते दहा हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. प्रवाशांच्या किमान अपेक्षेबरोबरच ई शिवनेरी बसमध्ये असणाऱ्या एसी यंत्रणा,पुश-बॅक सीट,रिडींग लॅम्प, चार्जिंग स्विच सारख्या सोयी सुविधा सुयोग्य असणे व त्याचा वापर कसा करावा; याची माहिती प्रवाशांना देणे अपेक्षित आहे.
शिवनेरीची सेवा वाहक विरहित असल्यामुळे इच्छित स्थळी उतरण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते.प्रवासामध्ये डुलकी लागणे,थोडा वेळ झोप येणे, यामुळे गंतव्य ठिकाणी न उतरता प्रवाशांना पुढील थांब्यावर जाऊन उतरावे लागते.इतकेच नाही तर चार साडेचार तासाच्या प्रवाशामध्ये सहप्रवाशाकडून गुंगीचे औषध देऊन लुटण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. अशा अप्रिय घटनांचा अटकाव करण्यासाठी मदतनीस म्हणून कोणीतरी असावे; असा विचार पुढे आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!