Friday, August 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय? - 'तो' कोणत्या निकषांवर दिला...

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय? – ‘तो’ कोणत्या निकषांवर दिला जातो? भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी काय दिले जाते…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय काल,३ ऑक्टोंबरला केंद्राने घेतल्याने मराठी मायबोली बद्दल अनेक दिग्गज तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा केला.केंद्राने मराठीसह बंगाली,पाली,आसामी,प्राकृत या ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय? ‘तो’ कोणत्या निकषांवर दिला जातो?
एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटणे. भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.भाषा भवन उभारणे,भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे,ग्रंथलये उभारणे,देशभरातील विद्यापीठे किंवा इतर संस्थांमार्फत भाषेचा प्रसार देखील यातून करता येतो.विशेष म्हणजे,भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्यासाठी व्यवस्था केली जाणार.प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.अभिजात दर्जा मिळाल्याने या भाषेतील विद्वान व्यक्तींना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना देखील करता येते.
आता भाषेला दर्जा तर मिळाला आहे; मात्र एखाद्या भाषेला अभिजात दर्जा कोणत्या निकषांवर दिला जातो? तर अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असावी लागते.या भाषेत समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी लागते.महत्त्वाचे म्हणजे हे साहित्य मूळ भाषेतीलच असावे,दुसऱ्या भाषांमधून अनुवाद केलेले नसावे.तसेच भाषेचा प्रवास हा अखंडित असावा. प्राचीन भाषा आणि सध्या वापरतो त्या भाषेतील नाते ठळक दिसावेत.या काही अटी आहेत; याच निकषांवर भाषेला अभिजात दर्जा दिला जातो.
भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी राज्यसरकारकडून हा प्रस्ताव पाठवल्यानंतर साहित्य अकादमीकडून भाषेच्या पुराव्यांची रीतसर तपासणी केली जाते, तथ्यांची पडताळणी केली जाते,काही त्रुटी आहेत का? ते बघितले जाते.या सगळ्या प्रक्रियेतून भाषा पास झाली की,मग केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडे भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शिफारस केली जाते व मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मांडला जातो; अशी संपूर्ण  प्रक्रिया भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी करण्यात येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!