Saturday, August 1, 2026
Homeकुरखेडाअन् चक्क माजी सरपंचानेच खेमराज नेवारे यांच्या पुढे वाचला समस्यांचा पाढा...

अन् चक्क माजी सरपंचानेच खेमराज नेवारे यांच्या पुढे वाचला समस्यांचा पाढा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या कुरखेडा तालुक्यातील वडेगाव गावातील माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य संजय कोरेटी यांनी सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांच्यापुढे ग्रामपंचायतीतील समस्यांचा पाढा उभा करीत पदाधिकाऱ्यांकडून कसे दुर्लक्ष केले जात आहे; हे लक्षात आणून दिले.आरमोरी विधानसभा क्षेत्राचे इच्छुक युवा उमेदवार खेमराज नेवारे यांनी वडेगाव व परिसरातील गावांना सदिच्छा भेट दिली असता गावातील समस्यांविषयी नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.
ग्रामपंचायत पदाधिकारी गाव विकासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चक्क माजी सरपंच यांनी सांगितले. माजी सरपंच यांच्या घरासमोरील आश्रम शाळेकडे जाणारा सिमेंट रस्ता पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला; मात्र,अजूनही सदर रस्त्याची दुरावस्था कायम आहे.जागोजागी खड्डे तयार झाले आहेत; त्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आंजणटोला येथे पाण्याची टाकी तयार करण्यात आली असून त्यात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही.अशा परिस्थितीत ऐन पावसाळ्यात सुद्धा पाणी टंचाईचा सामना समस्त गावकऱ्यांना सहन करावा लागतो आहे.यातून सुटका कोण करेल यासारखे अनेक विकासात्मक मूलभूत प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाले असून अजूनही ते प्रश्न अनुत्तरीत आहेत.खेमराज नेवारे यांनी गावातील संपूर्ण समस्या जाणून घेत ग्रामविकास अधिकारी, पंचायत समिती,कुरखेडा यांच्याशी निवेदनाद्वारे पत्रव्यवहार करून मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असा निर्धार केला.याप्रसंगी खेमराज नेवारे यांच्यासोबत वैभव परशुरामकर,जितेश कापगते, नरेश वासनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!