Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरचौघांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास आले यश.. - शेतकरी,शेतमजूरांसह गुराख्यांनी सोडला...

चौघांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास आले यश.. – शेतकरी,शेतमजूरांसह गुराख्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील जंगल परिसरात तसेच शेत शिवारात धुमाकूळ घालून  चौघांचा बळी घेणारी टी ८३ वाघिणीला चंद्रपूर वनविभागांतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील जानाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक- ७१७ मध्ये आज, शनिवार २८ सप्टेंबर रोजी वन विभागाकडून जेरबंद करण्यात आले.वाघिण जेरबंद झाल्याने तालुक्यातील शेतकरी,शेतमजूरांसह गुराख्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
चंद्रपूर वनविभागातील मुल उपक्षेत्रा अंतर्गत जानाळा, कांतापेठ,चिरोली,कवडपेठ,चिचाळा,ताडाळा परिसरातील मानव-वन्यजीव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन शेतकरी शेतमजूर,नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती.मागील काही दिवसांत जंगलालगतच्या शेतशिवारात चौघांचा जीव घेतला होता.त्यामुळे या गावांमध्ये प्रचंड दशहत निर्माण होऊन वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती.वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असताना वनविभागाने वाघिणीला जेरबदं करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.त्यानुसार आज शार्प शूटर अजय मराठे यांनी वाघिणीला बेशुध्द केले.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे व त्यांच्या चमुने वाघिणीवर उपचार केले.या वाघिणीने आता पर्यंत जंगलालगतच्या शेतशिवारात काम करणाऱ्या चौघांचा जीव घेतला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!