Monday, July 13, 2026
Homeनागपूर२७ वर्षीय तरुण चार वर्षांपासून ऑनलाइन बेटिंगच्या जाळ्यात.. - बेटिंगच्या सवयीमुळे उचलले...

२७ वर्षीय तरुण चार वर्षांपासून ऑनलाइन बेटिंगच्या जाळ्यात.. – बेटिंगच्या सवयीमुळे उचलले चोरीचे पाऊल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने ड्रॉवरमधील दीड लाख रुपयांवर डल्ला मारला.मात्र सीसीटीव्हीमुळे त्याच्या या कृत्याचा भंडाफोड झाला व पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून ऑनलाइन बेटिंगच्या सवयीमुळे त्याने चोरीचे पाऊल उचलले.वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अजित सुरेश दुबे वय २७ वर्षे,काचीमेट,पॉप्युलर सोसायटी असे आरोपीचे नाव आहे.त्याने फायर इंजिनिअरिंग केले असून तो चार वर्षांपासून ऑनलाइन बेटिंगच्या जाळ्यात अडकला आहे. त्यासाठी त्याने अनेकांकडून घेतले. उधार पैसे कर्जदारांचा तगादा वाढत होता व अखेर त्याने आईवडिलांचे घर विकून ३० लाख रुपयांचे कर्ज फेडले. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संघर्षनगर चौकाजवळ ओमेश शाहू वय ४३ वर्षे यांचे रॉयल क्लीप नावाचे हॉटेल आहे. तेथे अजित काम करत होता.१८ सप्टेंबर रोजी शाहू हे लॉकरची चाबी काऊंटरच्या ड्रावरमध्येच विसरले.त्यानंतर अजितने चाबीने लॉकर उघडून त्यातील दीड लाख रुपये लंपास केले.शाहू यांना लॉकरमध्ये पैसे न आढळल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली.मात्र,प्रत्येकानेच काहीच माहिती नसल्याचे सांगितले.त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता,त्यात अजितने पैसे चोरल्याची बाब स्पष्ट झाली.त्यांनी वाठोडा पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.पोलिसांनी अजितविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अजित अगोदर सदरजवळील एका हॉटेलमध्ये कामाला होता.तेथेदेखील त्याने पाच लाखांचा गैरव्यवहार केला होता.त्याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी नातेवाइकांनी हॉटेलचे पैसे परत केले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!