Tuesday, September 22, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे 'स्वच्छता पंधरवडा' निमित्त स्वच्छ माझे गाव,सुंदर माझे परिसर.. - ग्रामपंचायत,शाळा,ग्रामस्थांच्या...

कोंढाळा येथे ‘स्वच्छता पंधरवडा’ निमित्त स्वच्छ माझे गाव,सुंदर माझे परिसर.. – ग्रामपंचायत,शाळा,ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण गाव परिसरात स्वच्छता अभियान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-‘प्रत्येकाने आपल्या घरासह गावदेखील स्वच्छ राहील असा गुण अंगीकारला पाहिजे,तरच आपले गाव,राज्य व पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे; यामध्ये सर्व नागरिकांनीदेखील हिरीरीने सहभाग घ्यावा,’ असे आवाहन कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांनी केले आहे.
दरवर्षी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सर्वत्र ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा केला जातो.या अनुषंगाने स्वच्छ माझे गाव व सुंदर माझे परिसर
ही संकल्पना कोंढाळा ग्रामपंचायत राबवत असून या उपक्रमांतर्गत आज,शनिवार दिनांक-२८ सप्टेंबरला शाळा परिसर,गावातील मुख्य रस्ते,मुख्य चौक व वार्डातील परिसराची स्वच्छता करण्यात आली.
सरपंचा अपर्णा राऊत यांच्या उपस्थितीत गावातील संपूर्ण परिसराची सफाई करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव परिसरात ग्रामपंचायत पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,प्रतिष्ठित नागरिक,विविध समित्यांचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी एकत्र येऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गाव परिसराची सफाई केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा धडा आपल्याला दिला असून त्याचे रूपांतर स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे टाकत स्वच्छता हा प्रत्येकाचा स्वभाव व संस्कार झाला पाहिजे; असे ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांनी नमूद केले.ग्रामपंचायतीने
 स्वच्छता पंधरवड्याचे निमित्त साधून १५ दिवसांत स्वच्छतेसह काही उपक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.
यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन सेलोटे, पोलीस पाटील किरण कुंभलवार,देसाईगंज पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन राऊत,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,निखिल गोरे,ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप वाघाडे,प्रतिभा राऊत,शिल्पा चौधरी,भुमेश्र्वरी गुरूनुले,नलिना वालदे,कल्पना झिलपे,प्रफुल मेश्राम, गोकुल ठाकरे,प्रतिष्ठित नागरिक सीताराम धोटे, अनिता शेंडे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे,विद्या निकेतन लोकमान्य टिळक संकुल विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एम. देशमुख,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संतोष टेंभूर्णे, लालचंद धाबेकर,सुरेश आदे,माधुरी रामगुंडे,ममता घाटबांधे,रजनी जांभूळकर,भीमाबाई ठवरे,प्रवीण शेंडे,आरती चौधरी,मोहिनी झिलपे,विद्या निकेतन लोकमान्य टिळक संकुल विद्यालयाचे शिक्षक एस.एस.हर्षे,शिक्षिका आर.वाय.कन्नाके, ग्रामपंचायतीचे कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!