- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):- कुरखेडा तालुक्याच्या चारभट्टी गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सिंदेसूर येथील पतीराम चन्नू तूलावी वय ३३ वर्षे हा आपल्या शेतात काम करीत असताना ३० जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जंगलात असलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवत गंभीर जखमी केले होते.यावेळी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले होते.वनपरिक्षेत्र कार्यालय कुरखेडा यांच्यावतीने पंचनामा करीत मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.प्रस्तावाला मान्यता मिळताच पीडित पतीराम तुलावी यांना बोलावून पाच लाखांचा धनादेश वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी क्षेत्र सहायक एस.एल.शेंडे, वनकर्मचारी कादर शेख उपस्थित होते.
- Advertisement -

