Thursday, September 10, 2026
Homeगोंदियाअडीच वर्षीय चिमुकला अंगणातील विहीरीत पडला; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू...

अडीच वर्षीय चिमुकला अंगणातील विहीरीत पडला; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव शहरातील प्रभाग क्र.५ येथील अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल,१७ सप्टेंबरच्या दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. रेयांस संदिप शहारे,रा.अर्जुनी-मोरगाव असे  चिमुकल्याचे नाव आहे.

रेयांस हा घरासमोर खेळत असताना अचानक आईची व घरच्या मंडळींची नजर चुकवून अंगणातील विहीरीकडे गेला.यावेळी खेळताना त्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यु झाला.रेयांस दिसत नाही म्हणून घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली.पण रेयांस कुठेच सापडला नाही. प्रभागातील काही लोकांनी विहीरीत डोकावून पाहिले असता तो नजरेस पडला.त्याला बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. रेयांसचे वडील शहारे हे मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून रेयांस हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.या दुर्दैवी घटनेमुळे अर्जुनी मोरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!